आशाताई बच्छाव
विधानसभा निवडणूक 2024 मध्ये भारतीय जनता पार्टी व महायुती जिल्ह्यातील पाचही जागा जिंकणार….माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे..
जालना (दिलीप बोंडे ब्युरो चीफ):- भाजपा जिल्हा जालना ची (विस्तारित कार्यकारिणी बैठक) महा अधिवेशन हे भाजपा जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे व जालना महानगराध्यक्ष अशोक पांगारकर यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 06 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 10. वाजता मुक्तेश्वर लॉन्स,कचेरी रोड,जुना जालना संपन्न झाले
यावेळी आ.संतोष पाटील दानवे,आ.नारायण कुचे, भाजपा जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे, जिल्हा उपाध्यक्ष भास्करराव पाटील दानवे, रामेश्वर पाटील भांदरगे, राजेश राऊत, जालना महानगराध्यक्ष अशोक पांगारकर,सतिष घाटगे, एजाज भाई देशमुख, भाजपा जिल्हा सरचिटणीस सिध्दीविनायक मुळे, देवदिास कुचे, अतिक खान, सुनिल आर्दड, अर्जुन गेही, सोपान पेंढारकर, भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ.संध्याताई देठे, जिल्हा उपाध्यक्ष धनराज काबलिये, सतिष जाधव, देविदास देशमुख, पांडूरंग पोहेकर, बाबुराव मामा खरात, वसंतराव जगताप, सुहास मुंढे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष भागवत बावणे, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष कपील दहेकर, तालुकाध्यक्ष शिवाजीराव बोबडे, वसंतराव शिंदे, गणेश ठाले, ज्ञानेश्वर भागिले, भगवान मात्रे, प्रदीप पवार, विजय कामड, माजी सभापती राजेश चव्हाण, डॉ.अमोल कारंजेकर, जिल्हा चिटणीस स्नेहा जोशी, सुरेश दिवटे, डॉ.तुकाराम कळकुंबे,सुधाकर खरात,रोषण चौधरी, नगरसेवक महेश निकम,सुनिल पवार,चंपालाल भगत, प्रदीप साबळे, सत्यनारायण गिल्डा, कैलास उबाळे आदीची प्रमुख उपस्थीती होती.
माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे म्हणाले की, लोकसभा निवडणूक 2024 चा पराभव विसरा व येणाऱ्या विधानसभा निवडणूक 2024 मध्ये अंग झटकून कामाला लागा व विरोधकांचे फेक नरेटीव्ह खोडून काढण्याचे आवाहन करण्यात आले.