Home जालना जाफराबाद येथे नायब तहसीलदार पदी पदोन्नतीने श्री.डी.डी. गोत्राणे रुजू

जाफराबाद येथे नायब तहसीलदार पदी पदोन्नतीने श्री.डी.डी. गोत्राणे रुजू

230

आशाताई बच्छाव

1000616273.jpg

जाफराबाद येथे नायब तहसीलदार पदी पदोन्नतीने श्री.डी.डी. गोत्राणे रुजू
जाफराबाद तालुका प्रतिनिधी- मुरलीधर डहाके
दिनांक 06/08/2024
सविस्तर वृत्त असे की, जाफराबाद तहसील कार्यालयामध्ये श्री. डी. डी .गोत्राने हे नायब तहसीलदार म्हणून नव्याने रुजू झाले आहे. ते या अगोदर मंडळ अधिकारी होते. प्राथमिक माहिती नुसार ते आता संजय गांधी निराधार मध्ये काम पाहणार आहेत. त्यांच्या या निवडीने गोर गरीबांचे कामे होण्यास मदत होईल.विशेष म्हणजे डि.डि.गोत्राणे हे याअगोदर मंडळ अधिकारी म्हणून काम करत असल्याने त्यांना गोर- गरीब, सर्वसामान्य जनतेच्या अडिअडचणींची जाण असल्याने सर्वांना कामांच्या माध्यमातून न्याय देतील अशी अपेक्षा नागरिकांनी केली आहे.त्यांनी जाफराबाद तालुक्यातील जनतेचे कामं करावेत हीच अपेक्षा जाफराबाद तालुक्यातील नागरिकांनी व्यक्त केली आहे. श्री डी.डी. गोत्राने यांच्या या निवडीचे माहोरा येथील ग्रामपंचायत कर्मचारी श्री लक्ष्मण वाघ, सोमनाथ पन्हाळे व अंकुश जाधव टेलर, पिंपळगाव कड येथील सरपंच श्री. संदीप माजादे या सर्वांनी त्यांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले . त्यांच्या या पदोन्नतीचे जाफराबाद तालुक्यातून स्वागत करण्यात आले असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Previous articleजिल्हा सामान्य रुग्णालयाची नेहमीचीच रडगाणी! – ओपिडीत चक्क शौचालयाचे घाण पाणी !
Next articleलाडकी बहीण योजनेचे पैसे 15 ऑगस्टला महिलांच्या खात्यात जमा होणार.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.