Home बुलढाणा नागपुर येथील एम्स हॉस्पिटलमध्ये रुग्ण भरती करून दिल्याबद्दल मी अगदी मनातून आभार...

नागपुर येथील एम्स हॉस्पिटलमध्ये रुग्ण भरती करून दिल्याबद्दल मी अगदी मनातून आभार मानतो ….केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांच्या भूमिपुत्र वैद्यकीय कक्षेतुन झालेल्या मदती बद्दल रुग्णाच्या नातेवाईकांनी माणले आभार…

29
0

आशाताई बच्छाव

1000616254.jpg

नागपुर येथील एम्स हॉस्पिटलमध्ये रुग्ण भरती करून दिल्याबद्दल मी अगदी मनातून आभार मानतो ….केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांच्या भूमिपुत्र वैद्यकीय कक्षेतुन झालेल्या मदती बद्दल रुग्णाच्या नातेवाईकांनी माणले आभार…
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :-बुलढाणा नागपूर येथील एम्स हॉस्पिटलमध्ये रुग्णाला भरती करण्यासाठी टाळाटाळ करत असतानाच केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांच्या भूमिपुत्र वैद्यकीय मदत कक्षेतून फोन जाताच रुग्णाला भरती करून घेवून त्याच्यावर सुरू झाली उपचार …रुग्णांच्या नातेवाईकांनी मिळालेल्या मदतीबद्दल माणले केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांच्यासह वैद्यकीय कक्षेच्या चमुचे आभार ….
केंद्रीय आयुष व कुटुंब कल्याण राज्यमंत्री पदाचा फायदा जिल्ह्यातील नागरिकांना झाला पाहिजे या उदात्त हेतूने केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी बुलढाणा येथील जिजामाता स्टेडियम स्थित जनसंपर्क कार्यालयात भूमिपुत्र वैद्यकीय मदत कक्ष गेल्या आठ दिवसापूर्वीच स्थापन केलाय या कक्षेत दररोज अनेक रुग्ण व त्याची नातेवाईक आरोग्य सेवेच्या संदर्भात मदत घेण्यासाठी येत आहेमेहकर येथील अनिल वराडे यांचे सासरे गजानन महाकाळ यांना हार्टे आणि किडनीचा गंभीर आजार आहे त्यांचे हार्ट फक्त 20% काम करीत होते किडनी ही गंभीर स्थितीत असताना क्रिएटिन लेव्हल 4.33 एवढी होती अशा वेळेस नागपूर येथील हॉस्पिटलमधील डॉक्टर्स त्यांना भरती करून घेण्यास तयार नव्हते त्यावेळेस त्यांनी केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांचे विश्वासू अजय उमाळकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला व यासंदर्भाची माहिती त्यांना दिली त्याचवेळी अजुभाऊ उमाळकर यांनी बुलढाणा येथील भूमिपुत्र वैद्यकीय कक्षेचे प्रमुख राजीव भोर यांच्याशी संपर्क साधून त्या अनिल वराडे यांच्या नातेवाईका संदर्भातील आजाराविषयी माहिती दिली भूमिपुत्र वैद्यकीय कक्षाच्या वतीने नागपूर येथील प्रवीण शर्मा यांना या संदर्भाची माहिती देण्यात आली रुग्णाच्या नातेवाईकाला कोठेही फोन न करता त्या ठिकाणी राजू हेडाऊ यांनी येऊन लगेच गजानन महाकाळ यांना नागपूर येथील एम्स हॉस्पिटलमध्ये उपचार करिता भरती करण्यात आले. भूमिपुत्र वैद्यकीय मदत कक्षेच्या माध्यमातून झालेल्या मदती बद्दल मी अगदी मनातून आभार मानतो व धन्यवाद देतो अशी आभार पत्रच अनिल वऱ्हडे यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करत मोबाईल व्हाट्सअप वर भूमिपुत्र वैद्यकीय कक्षेला पाठवले आहे ज्या हेतूने केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी हा कक्ष रुग्णांच्या व नातेवाईकांच्या मदतीसाठी सुरू केलाय त्या मदत कक्षेची ही पोच पावती आहे ….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here