Home जालना मिरची वाहतूक करणारे वाहन भरधाव वेगाने धावतात अपघाताची शक्यता पोलीस प्रशासनाने लक्ष...

मिरची वाहतूक करणारे वाहन भरधाव वेगाने धावतात अपघाताची शक्यता पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याची गरज.

137

आशाताई बच्छाव

1000614496.jpg

मिरची वाहतूक करणारे वाहन भरधाव वेगाने धावतात अपघाताची शक्यता पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याची गरज.
जाफराबाद तालुका प्रतिनिधी-मुरलीधर डहाके दिनांक 05/08/2024
सविस्तर वृत्त असे की, जाफराबाद तालुक्यातील मीरची मार्केट जाफराबाद येथे असल्याने येथे मीरची मिरची वाहतूक करणारे ऑटो रिक्षा, ॲपे, पीकप अशी अनेक वाहने मिरची वाहतूक करतात . वाहतूक करत असताना वाहनाचा वेग हा मर्यादेपेक्षा अधिक असल्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते.पादचारी नागरिक, मोटरसायकल चालवणार्यांचा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली असून अपघात होण्याची शक्यता वाढली असल्याची भीती जाफराबाद तालुक्यातील नागरिकांनी बोलून दाखवली आहे. तरी पोलीस प्रशासनाने मिरची मार्केट मध्ये जाऊन तिथल्या वाहन धारकांना समज देऊन वाहनं कमी वेगाने चालविण्याच्या सूचना द्याव्यात अशी जाफराबाद तालुक्यातील शेतकऱ्यांची नागरिकांची मागणी आहे.

Previous articleप्राचार्य प्रो.डॉ विलास आघाव यांना भारत शिक्षक रत्न पुरस्कार प्रदान.
Next articleसंगमेश्वर येथे श्रावण सोमवार निमित्त महादेव दर्शनासाठी भाविकांची गर्दी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.