Home जळगाव दुचाकीस्वारास धडक देवून पळ काढणार्‍या वाहनचालकास पाठलाग करून पकडले

दुचाकीस्वारास धडक देवून पळ काढणार्‍या वाहनचालकास पाठलाग करून पकडले

153

आशाताई बच्छाव

1000610259.jpg

दुचाकीस्वारास धडक देवून पळ काढणार्‍या वाहनचालकास पाठलाग करून पकडले

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- भरधाव वेगाने वाहन चालवून दुचाकीस्वारास धडक देत त्याच्या मृत्युस कारणीभूत ठरणार्‍या पिकअप वाहनाचालकाचा चाळीसगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप पाटील व त्यांच्या मित्राने पाठलाग करून पकडले.
2 रोजी रात्री 11.15 वाजेच्या सुमारास एक पिकअप वाहन चालक भरधाव वेगाने वाहन चालवत मालेगाव कडून चाळीसगाव कडे येत असताना चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावर टाकळी जवळ हॉटेल चंद्रा जवळ दुचाकीस्वारास जबर धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यु झाला.अपघातानंतर पिकअप चालकाने चालकाने चाळीसगावकडे पळ काढला. अपघाताचा आवाज येताच हॉटेलच मालक राहुल पवार यांच्यासह सहकार्‍यांनी व जेवणासाठी आलेल्या ग्राहकांनी अपघातस्थळी धाव घेतली.
जवळच हॉटेल मध्ये जेवणाची वाट पाहत असलेले चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील व त्यांचे मित्र प्रितेश कटारिया हेही अपघाताच्या आवाजाने धावले. दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यु झाल्याने पळ काढलेल्या पिकअप चालकास पोलीस निरीक्षक संदीप पाटील व प्रितेश कटारिया यांनी खाजगी वाहनातून पाठलाग करून बेलगंगा साखर कारखान्याजवळ अपघात ओव्हरटेक करून पिकअप चालकास ताब्यात घेतले
त्याने रिहान उर्फ अब्बू अली सय्यद अली रा नागरदेवळा, त पाचोरा असे नाव असल्याचे सांगितले.अपघातानंतर लोक मारतील या भीतीने अपघात स्थळावरून पळ काढल्याची कबुली दिली. या पिकअप चालकासम मेहूणबारे पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले. या प्रकरणी राहुल पवार यांचे फिर्यादीवरून मेहुणबारे पोलीस स्टेशनला पिकअप चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous articleअखेर संतोष मेढेंच्या आंदोलनाला यश ! – तहसीलदार पिलारे यांची बदली..
Next articleजडीबुटी दिनानिमित्त नित्य योग वर्ग पतंजली व योग सहयोग कडून जुनी आयुडीपी परिसरात वृक्षारोपण
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.