आशाताई बच्छाव
ज्या कामासाठी नेमले तेच कामे करा अन्यथा कारवाई ला समोर जा कोणत्याही महसुलच्या कामचुकार कर्मचाऱीयांची गय केली जाणार नाही उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसेंचा इशारा …
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
सिंदखेड राजा :- बुलढाणा महाराष्ट्र मध्ये सदय विधानसभेचे वारे वाहू लागल्याने महसूल प्रशासन कामाला लागले आहे. विधानसभा निवडणुकीचे महत्त्वाची कामे सुरू आहेत. त्यातच या ठिकाणी. सिंदखेडराजा येथे कायमस्वरूपी तहसीलदार नसल्याने सर्व कामे उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनाच करावी लागत आहेत. काही कर्मचारी मात्र कामात दिरंगाई करत असल्याचे दिसून येत आहे नेमणूक झालेल्या ठिकाणी रुजू न होण्याचे प्रकार घडत आहेत. अशा कामचुकार कर्मचाऱ्यांना उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांनी चांगलाच इशारा दिली आहे. कामे नीट करा; अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिल्याने कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस तत्कालीन तहसीलदार सचिन जयस्वाल यांच्यावर लाचलुचपत विभागाची कारवाई झाल्यामुळे त्यांचे निलंबन झाले. सध्या तहसीलदाराचा कारभार प्रभारीच्या खांद्यावर आहे.
तहसीलदार प्रविण धानोरकर रजेवर गेल्यामुळे सर्व कामे उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांना करावी लागत आहेत. शेती प्रकरणाचा निपटारा करणे, रात्रभर वाळूवर गस्त ठेवणे आणि निवडणुकीचे काम पाहणे व अन्य कामे असा
मोठा कामाचा ताण त्यांच्यावर पडला आहे.त्यात काही
कर्मचारी कामचुकारपणा करत आहेत. कामात दिरंगाई केल्याचे उपविभागीय अधिकारी यांच्या लक्षात आले आहे दरम्यान,,प्रा संजय खडसे यांनी कर्मचाऱ्यांना बोलावून चांगली तंबी दिली. काही कर्मचारी प्रतिनियुक्तीवर आहेत, तर काही कर्मचाऱ्यांच्या बदल्या होऊनदेखील ते कामावर रुजू झाले नाहीत. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांना प्रा. खडसे यांनी चांगलेच फटकारले. नीट कामे करा, ही शेवटची संधी आहे
अन्यथा कठोर कारवाई करून सरळ निलंबित करेन, अशी सक्त ताकीद दिली.
काही कर्मचाऱ्यांच्या बदल्या होऊन देखील ते रुजू झाले नाहीत. तर काही प्रतिनियुक्तीवर अनेक टेबल सांभाळत आहेत. ज्या ठिकाणी सोयीची कामे मिळतात, तेथेच ते काम करतात.ज्या ठिकाणी त्रास होतो ते काम करत नाहीत. काही कर्मचारी आपल्या कामात दिरंगाई आणि कामचुकारपणा करतात. ही बाब उपविभागीय अधिकारी प्रा खड़सेंनी गांभीर्याने घेतली. काम सोडून विनाकारण बाहेर गेल्यास निलंबनाची कारवाई करू, असा इशारा प्रा संजय खडसे यांनी दिला आहे. कायमस्वरूपी तहसीलदार देण्याची मागणी
सिंदखेडराजा तहसीलमध्ये आधीच कर्मचाऱ्यांची आणि नायब तहसीलदारांची कमतरता आहे. प्रभारी तहसीलदार प्रवीण धानोरकर सुटीवर गेल्यामुळे संपूर्ण तहसीलचे कामकाज निवडणूक विभाग वगळता प्रभारी तहसीलदार म्हणून डॉ. आसमा मुजावर यांना सांभाळावे लागत आहे. या ठिकाणी प्रशासनाने तत्काळ कायमस्वरूपी तहसीलदारांसह नायब तहसीलदारांची नेमणूक करावी,अशी मागणी होत आहे






