आशाताई बच्छाव
आपले सरकार पोर्टल असुरळीत; विद्यार्थ्यांचे होतय नुकसान: आ.नमिता मुंदडा
मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा
बीड/अंबाजोगाई दि:०२ संपूर्ण बीड जिल्ह्यातील आपले सरकार पोर्टल महाऑनलाईन असुरळीत झाले असून सदरील व्यत्ययामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होत असून, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः लक्ष घालावे अशी विनंती आ. नमिता अक्षय मुंदडा यांनी केली आहे. या संदर्भात नमिता अक्षय मुंदडा यांनी एका निवेदनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना एक निवेदन दिले असून या निवेदनात असे म्हटले आहे की, बीड जिल्ह्यात सध्यस्थितीत ऑनलाइन प्रमाणपत्रांचे महा ऑनलाईन आपले सरकार पोर्टल सुरळीत नसल्याने विद्यार्थ्यांचे विविध आवश्यक प्रमाणपत्रे व लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्रे विहित मिळत नसल्याने तक्रारी नागरिकांकडून प्राप्त होत आहेत. सदरचे कामकाजाबाबत तहसील कार्यालय अंबाजोगाई येथे विचारणा केली असता सदरचे पोर्टल हे कार्यालयीन वेळामध्ये ४०४ दाखवत असून सर्वर लोड घेत असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच रात्रीच्या वेळी प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी काम करत असताना पोर्टल हे अत्यंत संथगतीने चालत असल्याचे त्यांनी कळविले आहे. तरी सदर प्रकरणात विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र व मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्र लवकरात लवकर मिळण्याच्या अनुषंगाने सदर पोर्टल लवकरात लवकर सुरळीत सुरू होण्यासाठी आपल्या स्तरावर कारवाई करण्यात यावी. सदर प्रमाणपत्र अभावी कोणत्याही विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी कार्यवाही करण्याबाबत आदेश व्हावेत अशी विनंती आ. नमिता अक्षय मुंदडा यांनी केली आहे.