Home बुलढाणा आमदार राजेश एकडे साहेब इकडे लक्ष देता का? – निधी उपलब्ध असूनही...

आमदार राजेश एकडे साहेब इकडे लक्ष देता का? – निधी उपलब्ध असूनही रस्त्याचे काम रखडले

123

आशाताई बच्छाव

1000602138.jpg

आमदार राजेश एकडे साहेब इकडे लक्ष देता का? – निधी उपलब्ध असूनही रस्त्याचे काम रखडले
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर

मलकापूर :- बुलढाणा आमदार राजेश एकडे यांनी निधी उपलब्ध केला. चार महिन्या अगोदर रस्त्याचे भूमिपूजन केले केले होते. या भूमिपूजनाचा आमदारांना विसर पडला असून मलकापूर तालुक्यातील घिर्णी गावातील रस्त्यावरून विद्यार्थी -ग्रामस्थांना चिखल तुडवीत जावे लागत आहे.
मलकापूर तालुक्यातील प्रति शेगाव म्हणजेच घिर्णी गावातील बरेचसे नागरिक शेतीचे काम करण्यास सोपे व्हावे यासाठी आपल्या शेतामध्येच राहतात आणि तिथूनच आपला उदरनिर्वाह करतात आणि आपल्या मुलांना शिकवतात परंतु अनेक वर्षांपासून त्यांना अत्यावश्यक सेवेसाठी गावांमध्ये यावे लागते.
दगड गोट्यांचा खडतर प्रवास करून नागरिक गावामध्ये पोहोचतात परंतु पावसाळ्यामध्ये ही स्थिती खूप बिकट होते. शाळांमध्ये आपल्या लहान लहान लेकरांना घेऊन जाताना मोठी कसरत करावी लागते. काही महिने अगोदर गावातील काही ठराविक शेतकरी व नागरिकांनी तालुक्याचे आमदार राजेश एकडे यांच्या कानावर ही बातमी टाकली व त्यांनी क्षणाचाही विलंब न करता निधी उपलब्ध करून दिला परंतु गावातील पुढाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे नागरिकांमध्ये मोठा आक्रोश आहे. याकडे गावातील ग्रामपंचायतचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे.

Previous articleमन्नत फाउंडेशन सैलानी तर्फे जनता वि‌द्यालयात पायी पंढरपूर वारी करणाऱ्या वारकऱ्यांचा सत्कार
Next articleथेंबे थेंबे तळे साचे..!’ – येळगाव धरण तहानलेलेच ! – केवळ 35 टक्के जलसाठा!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.