Home जालना त्र्यंबकराव वाघ ब्रांच पोस्टमास्टर बि.वो. गोंदेगाव यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा संपन्न .

त्र्यंबकराव वाघ ब्रांच पोस्टमास्टर बि.वो. गोंदेगाव यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा संपन्न .

98

आशाताई बच्छाव

1000600608.jpg

त्र्यंबकराव वाघ ब्रांच पोस्टमास्टर बि.वो. गोंदेगाव यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा संपन्न . जिल्हा प्रतिनिधी जालना-वसंतराव देशमुख दिनांक 01/08/2024. याविषयी सविस्तर माहिती अशी की ,गोंदेगाव ता.जि.जालना येथील श्री त्र्यंबकराव रामभाऊ वाघ ब्रॅंच पोस्ट मास्टर बी.ओ.गोंदेगाव सब पोस्ट ऑफिस जालना आर .एस.यांच्या सेवा पुर्ती निमित्त निरोप समारंभ व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. श्री त्र्यंबकराव वाघ यांची नियुक्ती हि दिनांक 24/02/1992 रोजी झाली होती .नियत वयोमानानुसार दिनांक 31/07/2024 रोजी नियत वयोमानानुसार आपल्या 32 वर्षाच्या प्रदिर्घ सेवेनंतर सेवा निवृत्त झाले .ग्रामीण भागात पाण्या -पावसात त्यांनी इमानदारीने सेवा पार पाडली.त्यांच्या याच कार्याचा गौरव म्हणून त्यांचा सेवापुर्ती सत्कार सोहळा संपन्न झाला . कार्यक्रमाच्या सुरुवातीला सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी भारतीय डाक विभागाचे श्री जाधव साहेब असिस्टंट पोस्टमास्तर , श्री ऋषी मनोहरकर, श्री दांडगे , श्री खरात पोस्ट मास्तर , लांडगे साहेब पोस्टमास्टर, अंभोरे साहेब पोस्टमास्टर , श्रीराम वाघ सरपंच माळेगांव ,गोंदेगावचे उपसरपंच श्री साहेबराव वाघ, पांडुरंग भालेकर,मोकींदराव वाघ, देवराव वाघ,बद्रिशेठ वाघ, गणेश निंबाळकर, सावजी वाघ, अशोक वाघ, भालेकर सर, अंकुशराव वाघ, बाबासाहेब वाघ, ज्ञानेश्वर वाघ, नितीन वाघ,लहु वाघ,यांसह गावातील व परिसरातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.