Home बुलढाणा पांढरदेव-एकलारा रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य, ठेकेदार देतोयमृत्यूला आमंत्रण ….

पांढरदेव-एकलारा रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य, ठेकेदार देतोयमृत्यूला आमंत्रण ….

33
0

आशाताई बच्छाव

1000597637.jpg

पांढरदेव-एकलारा रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य, ठेकेदार देतोयमृत्यूला आमंत्रण ….
युवा मराठा न्यूज संजय पन्हाळकर बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ
चिखली :- बुलढाणा तालुक्यातील पांढरदेव गावाला जोडणारा एकमेव एकलारा पांढरदेव रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे आणि संथ गतीने सुरू आहे याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग अध्यक्ष समाधान म्हस्के यांनी याबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांनावतक्रार सुद्धा केली होती. मात्र तक्रारीला काहीही न जुमानता रस्त्यावर गिट्टी टाकून त्यावर माती मिश्रित मुरम टाकण्यात आला. परंतु गेल्या काही दिवसांपासून सततच्या पावसामुळे मुरुमाचे रूपांतर चिखलात झाले आहे. पांढरदेव येथून दररोज ये जा करणारे प्रवासी, शाळेतील मुले, व्यवसाय व कामानिमित्त बाहेरगावी जाणारे नागरिक मोटारसायकल घसरून यावरून पडत आहे चाकाला चिखल लागल्याने चाक जाम झाल्यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहे. गावाचे तलाठी यांना मोटरसायकल उभी करून पायी प्रवास करावा लागल्याची खेदजनक बाब समोर आली आहे. त्यामुळे मातीच्या रस्त्यापेक्षा खड्डयांचा रस्ता बरा होता अशी चर्चा होत आहे.
दररोज शेकडो वाहने ये जा करत असतांना मतिमिश्रित मुरुमामुळे जनसामान्यांचे हाल होत असून या चिखलमय रस्त्यावरून एखादी दुचाकी गाडी घसरून एखाद्या नागरिकाची जीवित्वाची हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ठेकेदार व संबंधित अधिकारी यांनी तात्काळ माती बाजूला करून रस्ता तयार करावा अशी मागणी होत आहे.

Previous articleभाजपा आमदार श्वेता महाले यांच्या बॉडीगार्डची आत्महत्या …
Next articleपावसाळा तोंडावर असुनही पांदण रस्ते दूर्लक्षीतच,पाणंद रस्ते दुरुस्ती करणे धाड परिसरातील शेतकऱ्यांची मागणी …
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here