Home बुलढाणा किनगाव राजात कुठे तुटले वाईन बारचे शेंटर,१,७०,४२० रुपयाचा मुद्दे मालहि केला लंपास….

किनगाव राजात कुठे तुटले वाईन बारचे शेंटर,१,७०,४२० रुपयाचा मुद्दे मालहि केला लंपास….

26
0

आशाताई बच्छाव

1000597614.jpg

किनगाव राजात कुठे तुटले वाईन बारचे शेंटर,१,७०,४२० रुपयाचा मुद्दे मालहि केला लंपास….
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर

किनगाव राजा :-बुलढाणा पोलीस स्टेशन अंतर्गत किनगाव राजा येथील तपस्या नावाचे वाईन बारचे शटर तोडून अज्ञात चोरट्यांनी विदेशी दारुसह नगदी ऐवज मिळून १,७०,४२० रुपयाचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेला उपरोक्त घटना ही २५ जुलै रोजी रात्री घडली.बार मालक सुनील बबनराव चपाईतकर वय ४९ वर्ष यांनी तक्रार दिली की,सकाळी सकाळी शेताकडे व बारकडे चक्कर मारण्यासाठी गेलो असता तेव्हा मला वाईन बारचे कुलुप व कोंडा तुटलेला दिसला म्हणून मी बारमध्ये जाऊन पाहिले असता तर मला गोडाऊनचे दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले.आत जाऊन पाहणी केली असता विदेशी दारु ठेवलेल्या खोलीचे कुलूप तोडून आतील दारू किंमत १ लाख ७० हजार ४२० रुपये, किमतीचा कोणीतरी अज्ञात चोट्याने चोरून नेला आहे.सुनील बबनराव चपाईतकर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी कलम ३३४ (१), ३०५ (ए) २०२३ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ए. एस.आय. शरद ठोंबरे व एन. पि. सि .विष्णू मुंडे हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here