Home Breaking News समरगीत स्पर्धा नागपूर येथे आयोजित साकोली संघाचे नेतृत्व भावेश कोटांगले & संच...

समरगीत स्पर्धा नागपूर येथे आयोजित साकोली संघाचे नेतृत्व भावेश कोटांगले & संच करणार

226

Yuva maratha news

1000579533.jpg

समरगीत स्पर्धा नागपूर येथे आयोजित साकोली संघाचे नेतृत्व भावेश कोटांगले & संच करणार

 

नागपूर (संजीव भांबोरे)महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गट कार्यालय १ , चंदननगर नागपुर येथे आयोजित गटस्तरीय समरगीत/ स्फूर्तीगीत स्पर्धा दि.२६ जुलै २०२४ आयोजित करण्यात आली आहे . त्यामध्ये प्रबोधनकार कला साहित्य संघाचा सहभाग राहणार आहे.
साकोली येथील कामगार कल्याण केंद्र साकोली चे केंद्र संचालक सतीश कुटे यांच्या नेतृत्वात प्रबोधनकार कला साहित्य संघाचे पदाधिकारी व कलावंत समरगीत नागपूर येथे आयोजित समरगीत स्पर्धेत सादर करणार आहेत.
त्यामध्ये संघात जिल्हा अध्यक्ष भावेश कोटांगले, प्रज्ञाशील मेश्राम, पितांबर सूर्यवंशी, राहुल कापगते, अमर दिघोरे, लक्ष्मीकांत बोरकर,संदीप कोटांगले खुशाल इठोले, अभिषेक रामटेके, प्रल्हाद भुजाडे, अर्चना कान्हेकर, प्रतिभा साखरे, करिष्मा भाग्यवंत , हे कलावंत कामगार कल्याण केंद्र साकोली च्या वतीने सहभागी होणार आहेत.