Home जालना माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या प्रयत्नांमुळे जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचार्‍यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक...

माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या प्रयत्नांमुळे जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचार्‍यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक : प्रश्न मार्गी लागणार

123

आशाताई बच्छाव

1000562108.jpg

माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या प्रयत्नांमुळे जिल्हा परिषद
लिपिकवर्गीय कर्मचार्‍यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक : प्रश्न मार्गी
लागणार
लिपिकवर्गीय कर्मचार्‍यांच्या प्रश्नांबाबत चर्चेअंती लक्ष वेधले
जालना, दि. १९(दिलीप बोंडे ब्युरो चीफ)-महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषद लिपिकवर्गीय
कर्मचार्‍यांच्या मागण्या गेल्या अनेक वर्षापासुन प्रलंबीत आहे. याची
आतापर्यंत कोणत्याही शासनाने गांभीर्याने दखल घेतली गेली नाही. माजी
राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी संघटनेच्या पदाधिकार्‍यांच्या
विनंतीवरुन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचेकडे बैठक घेऊन व खासदार डॉ.
श्रीकांत शिंदे यांच्यासोबत लिपिकवर्गीय कर्मचार्‍यांच्या अडीअडचणी जाणुन
घेऊन त्यांच्या प्रश्नाबाबत चर्चा केली.
लिपिकवर्गीय कर्मचार्‍यांच्या मागण्यांमध्ये राज्यातील लिपिकवर्गीय
कर्मचार्‍यांचे समान काम समान वेतन व समान पदोन्नतीचे टप्पे करणे,
राज्यातील जिल्हा परिषदेमीधल लिपिकवर्गीय कार्मचार्‍यांच्या वेतन त्रुटी
मध्ये सुधारणा करण्याबाबत चर्चा करुन हे प्रश्न सोडविण्याबाबत सचिवांना
सुचना देऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. याबद्दल जिल्हा परिषद
लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष मारुती जाधव, राज्य सरचिटणीस
अरुण जोर्वेकर, राज्य कोषाध्यक्ष उमाकांत सुर्यवंशी, राज्यउपाध्यक्ष संजय
चव्हाण, जिल्हाध्यक्ष अनिल भेरे-पाटील, नारायण कावळे यांनी मुख्यमंत्री
एकनाथराव शिंदे यांचे व माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांचे आभार
व्यक्त करुन लिपिकवर्गीय कर्मचार्‍यांनी समाधान व्यक्त केले.

Previous articleआ. कैलास गोरंट्याल यांच्या उपस्थितीत ग्रामीण अल्पसंख्यांक पदाधिकार्‍यांची बैठक
Next articleराज्य राखीव पोलीस बलाच्या शारीरिक व मैदानी चाचणीचा शेवट मंगळवारी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.