आशाताई बच्छाव
भादोला येथील वरली मटका जुगारावर धडाकेबाज कारवाई, मुदेमलाही केला जप्त बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशनची कारवाई…
युवा मराठा न्यूज संजय पन्हाळकर बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ
बुलढाणा :- बुलढाणा तालुक्यातील भादोला येथे पेट्रोलिंग करीत असताना गुप्त माहितीच्या आधारे वरली मटक्याच्या जुगाराची गोपनीय माहिती बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गोकुळसिंग राठोड,नापोका सुनील वाघ ब.न २०१६ पोहेका राजू सोनुने बं.न १६२४, यांना मिळाली. भादोला येथील बस स्टँड परिसरात मध्ये सुरडकर जिलेबी सेंटरच्या दुकानाच्या पाठीमागे जुगार खेळल्या जात असल्याची माहिती मिळाली. त्या ठिकाणी छापा टाकला असता एका व्यक्तीला वरली मटक्याच्या चिठ्ठ्या लिहिताना दिसला त्याचे नाव कन्हैया मोहन वर्मा वय २५ वर्ष राहणार मिलिंद नगर बुलढाणा अशे त्यांनी सांगितले त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ वरली मटका आकडे लिहिलेली चिट्टी १ काळा पेन किंमत १० रु एक कार्बन तुकडा, व नगदी १०५० रुपये असा एकूण १०६० रुपयाचा मुद्देमाल मिळून आलेला आहे, त्या ठिकाणी पंचनामा करून कलम ३५(३) भारतीय नागरिक संरक्षण २०२३ प्रमाणे समज देऊन सोडविण्यात आले. जप्त केलेला मुद्देमाल हा पोलीस स्टेशनला जमा केलेला आहे.