Home वाशिम अनसिंग येथे वारंवार विद्युत पुरवठा खंडीत होत असल्यामुळे सहा. अभियंत्याच्या खुर्चीला हार...

अनसिंग येथे वारंवार विद्युत पुरवठा खंडीत होत असल्यामुळे सहा. अभियंत्याच्या खुर्चीला हार घालून मनसेने दिले निवेदन

307

आशाताई बच्छाव

1000561604.jpg

अनसिंग येथे वारंवार विद्युत पुरवठा खंडीत होत असल्यामुळे सहा. अभियंत्याच्या खुर्चीला हार घालून मनसेने दिले निवेदन
प्रतिनिधी/ गोपाल तिवारी 
वाशिम : अनसिंगमधील विद्यूत पुरवठा वारंवार खंडीत होत असल्याने तसेच विद्यूत भार स्थिर राहत नसल्याने निवेदन देण्यासाठी गेलेल्या मनसे कार्यकर्त्यांना विद्युत वितरण कंपनीचे सहा. अभियंता कार्यालयात हजर नसल्यामुळे त्यांनी रिकाम्या खुर्चीला हार घालून निवेदन देवून दि. 18 जुलै रोजी अनोखे आंदोलन केले.
अनसिंग येथील सहा. अभियंता हे नेहमी कार्यालयात गैरहजर असतात व अनसिंग येथे मुख्यालय असताना सुध्दा त्यांनी आपले कार्यालय पिंपळगावला केले असून, नागरिकांना नाहक अनसिंग सोडून पिंपळगावला जावे लागत असल्याने मनसेचे यश चव्हाण व त्यांच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत सहाय्यक अभियंता यांच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून निवेदन देवून अनोखे निषेध आंदोलन केले.
यावेळी अनसिंग शहर अध्यक्ष अमोल पोहरकर, शुभम काळे, अनंता ढोके, वैभव कव्हर, गोपाल ढोके, बादल राजगुरू मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleदेवळा तालुक्यात शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण; बिबट्याच्या हल्ल्यात आठ शेळ्या ठार
Next articleहॉटेल व्यावसायिकांनी एका महिन्याच्या आत व्यवसाय इमारतींचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करावे – आयुक्त शेखर सिंह
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.