Home नाशिक देवळा तालुक्यात शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण; बिबट्याच्या हल्ल्यात आठ शेळ्या ठार

देवळा तालुक्यात शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण; बिबट्याच्या हल्ल्यात आठ शेळ्या ठार

132

आशाताई बच्छाव

1000561602.jpg

देवळा तालुक्यात शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण; बिबट्याच्या हल्ल्यात आठ शेळ्या ठार

सतीश सावंत-विभागीय प्रतिनिधी : क. स. मा. दे.

तालुक्यातील खर्डे येथे शुक्रवारी (दि. १९) रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास बिबट्याच्या हल्ल्यात आठ शेळ्या ठार झाल्याच्या घटनेने परिसरातील पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, शुक्रवारी (दि. १९) रोजी रात्री ३ वाजेच्या सुमारास देवळा तालुक्यातील पश्चिम भागातील खर्डे येथील शेतकरी वसंत कारभारी पवार यांच्या घरासमोरील हाकेच्या अंतरावर असलेल्या शेतातील गोठ्यात बिबट्या शिरला आणि त्याने यातील आठ शेळ्या फस्त केल्या.

नेमकं काय घडलं..?

सकाळी उठल्यावर ही घटना पवार यांच्या लक्षात आली. या घटनेची माहिती पवार यांनी आपल्या जवळच्या लोकांना सांगितल्यावर सर्वांनीच घटनास्थळी धाव घेतली. शेतीपूरक व्यवसाय म्हणून त्यांनी आपल्या शेतात गोटफार्म तयार करून शेळीपालन व्यवसाय सुरू केला आहे. या गोठ्यात बंदिस्त असलेल्या शेळ्यांवर बिबट्याने हल्ला चढविला व यात त्याने आठ शेळ्या ठार झाल्याने पवार यांचे जवळपास ८० ते ९० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. बिबट्याच्या दहशतीने या परिसरातील पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनास्थळी वनविभागाचे कर्मचारी गवळी यांनी भेट देऊन पंचनामा केला आहे. याची नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी वसंत पवार, केदा पवार यांनी केली आहे.

Previous articleदेवळ्यात भरदिवसा घरफोडी; चोराने रोख रक्कम व सोने केले लंपास
Next articleअनसिंग येथे वारंवार विद्युत पुरवठा खंडीत होत असल्यामुळे सहा. अभियंत्याच्या खुर्चीला हार घालून मनसेने दिले निवेदन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.