Home बुलढाणा वरवंड शिवारात अनोळखी महिलेचे आढळले प्रेत, जानेफळ पोलीस स्टेशनने प्रेताबद्दल माहिती मिळाल्यास...

वरवंड शिवारात अनोळखी महिलेचे आढळले प्रेत, जानेफळ पोलीस स्टेशनने प्रेताबद्दल माहिती मिळाल्यास संपर्क करण्याचे केले आवाहन 

108

आशाताई बच्छाव

1000559211.jpg

वरवंड शिवारात अनोळखी महिलेचे आढळले प्रेत, जानेफळ पोलीस स्टेशनने प्रेताबद्दल माहिती मिळाल्यास संपर्क करण्याचे केले आवाहन
युवा मराठा न्यूज संजय पन्हाळकर बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ
जानेफळ :-बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुका अंतर्गत जानेफळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजिनाथ मोरे यांनी अनोळखी स्त्री जातीचा मृत्यू झालेला आहे अंदाजे ४५ वर्ष दिनांक १७/०७/२०२४ रोजी सकाळी ७ वाजेच्या दरम्यान ग्राम वरवंड तालुका मेहकर शिवारातील आश्रम शाळेसमोर मिळून आले आहे. सदर महिलेची अद्यापही ओळख पटलेली नाही याची मृत्यूचे बाबत पोलीस स्टेशन जानेफळ येथे आ.मॄ.नंबर २०/२०२४ कलम १९४ BNNS २०२३ प्रमाणे दि.१७/०७/२०२४ रोजी दाखल असून अनोळखी स्त्री जातीचे वय अंदाजे ४५ वर्षे अंगात निळ्या रंगाची टीपटॉप चे ब्लाउज व निळ्या रंगाची साडी केस लहान व चेहऱ्यावर खरचटलयचे निशान व उजव्या हातावर मंदिरा सारखा गोंदण्याचे चित्र आहे.

तरी या महिलेबाबत काही माहिती प्राप्त झाल्यास जानेफळ पोलीस स्टेशनला कळवावे.खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करावा. पोहेकॉ अजिनाथ मोरे ८१४९४०७२४५ /पोहेकॉ कैलास चतरकर ९५२७५३१८९९/ पोहेकॉ गणेश शिंदे ९६३७५६०८१९ या नंबर वर कळवण्याचे जानेफळ पोलीस स्टेशन नी आवाहन केले आहे.