आशाताई बच्छाव
आंचरवाडी जवळील वसंतनगर शेतशिवारात जबरी चोरी, सोन्या,चांदीचे दागिने घेऊन चोरटे पसार.वृध्द दांपत्याना मारहाण!
युवा मराठा न्यूज संजय पन्हाळकर बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ
देऊळगाव राजा :- बुलढाणा चिखली – देऊळगाव राजा महामार्गाला लागूनच असलेल्या आंचरवाडी जवळील वसंतनगर शेतशिवारात अज्ञात चोरट्यांनी जबरी चोरी करून सोन्या,चांदीचे दागिने घेऊन पसार झाल्याचे घटना दि.१६ जुलैच्या राञी दहा वाजताच्या सुमारास घडली याबाबत सविस्तर वृत्त असे की वसंतनगर येथील रहिवासी असलेले वृध्द दाम्पत्य विष्णू फुलसिंग राठोड व पत्नी सौ.जिजाबाई विष्णू राठोड हे दोघे कोरोना काळापासून वसंत नगर गावालगत असलेल्या गट नंबर ३०मध्ये टिनपञाच्या शेडमध्ये राहतात.व शेतीचा कामधंदा करतात.दि.१६ जुलैच्या राञी जेवून आटोपून हे वृध्द दाम्पत्य लाकडी बाजेवर झोपले असताना राञी दहा वाजताच्या सुमारास अचानक शेतातील कुञे भुकंत असल्याने अचानक जाग येताच दोन अनोळखी इसम येऊन पती विष्णू फुलसिंग राठोड यांना लोखंडी रॉड ने पायावर,पाठीवर जबर मारहाण करून लागले.आणि पत्नीला लोखंडी रॉड चा धाक दाखवत गळयातील दोन मंगलसुञ,कानातील सोन्याची फुले,गळयातील सोन्याची बारीक मनी पोत, हातातील चांदीच्या पाटल्या असा एकुण जवळपास एक लाखाचे दागिने घेऊन चोरटे पसार झाले.वृध्द दांपत्य यांनी जोराने आरडाओरडा केल्याने जवळच असलेले प्रेंमसिंग राठोड आले असता त्यांनी कृष्णा नावाच्या मुलास घटनास्थळी बोलावुन घेतले.कृष्णाने तात्काळ अंढेरा पोलिस स्टेशनला घटनेबाबत माहिती दिली असता.अंढेरा पोलिस स्टेशनचे ठाणेदार विकास पाटील आणि गोरख राठोड यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.तो पर्यंत चोरटे पसार झाले होते.अंढेरा ठाणेदार विकास पाटील यांनी चोरटे ज्या दिशेने पळाले त्या दिशेने जाफराबाद पर्यंत राञीच शोध घेतला परंतु चोरटे पसार होण्यात यशस्वी झाले.याबाबत एलसीबीचे प्रमुख अशोक लांडे यांनी राञीच घटना स्थळी भेट दिली.तसेच देऊळगाव राजा उपविभागीय पोलिस अधिकारी मनिषा कदम यांनी सकाळी घटनास्थळ गाठुन माहिती घेतली. विष्णू फुलसिंग राठोड यांच्या पत्नी सौ.जिजाबाई विष्णू राठोड यांच्या फिर्यादीवरून अंढेरा पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता अंतर्गत कलम ३०९(६),३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास अंढेरा ठाणेदार विकास पाटील करत आहे.
चिखली येथील जंजाळ हाॅस्पीटल येथे उपचार सुरू
यामधील वृध्द विष्णू फुलसिंग राठोड वय ७० वर्षे यांना अज्ञात चोरट्यांनी लोखंडी रॉडने पायावर जबर मारहाण केल्याने यामध्ये त्यांचे दोन्ही पाय फॅक्चर झाले असुन त्यांना राञी त्यांचा मुलगा भगवान विष्णू राठोड यांने खाजगी रुग्णवाहिकेतून चिखली येथील जंजाळ हाॅस्पीटल मध्ये भरती करण्यात आले असून उपचार सुरू आहेत.