Home जालना पोलीस पाटलांचे 700 रिक्त पदे भरा. अन्यथा आंदोलन छेडणार, बळीराजा फाऊंडेशनचे जिल्हाधिकाऱ्यांना...

पोलीस पाटलांचे 700 रिक्त पदे भरा. अन्यथा आंदोलन छेडणार, बळीराजा फाऊंडेशनचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

100

आशाताई बच्छाव

1000548499.jpg

पोलीस पाटलांचे 700 रिक्त पदे भरा. अन्यथा आंदोलन छेडणार, बळीराजा फाऊंडेशनचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
जिल्हा प्रतिनिधी जालना -वसंतराव देशमुख
दिनांक 16/07/2024

जिल्ह्यातील ९२० पैकी २०७ गावांमध्ये पोलिसपाटील कार्यरत आहेत. तर ७१४ गावांत पोलिस पाटील नसल्याने तंटे थेट पोलिस ठाण्यात जात आहेत.त्यामुळं तात्काळ पोलीस पाटलांची पद भरती करण्यात यावी अशी मागणी बळीराजा फाऊंडेशन चे अध्यक्ष नारायण लोखंडे यांनी निवासी उपजिल्हाधिकारी सोहंम वायाळ यांच्याकडे केली आहे.दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की पोलिस पाटील हे गाव पातळीवरील महत्त्वाचे पद आहे. गावात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, या दृष्टीने पोलिस पाटलांचे मोठे योगदान असते. पोलिस आणि ग्रामस्थ यांच्यातील दुवा म्हणून पोलिस पाटील काम करतात. तसेच गावातील भांडण तंटे, वाद पोलिस ठाण्यापर्यंत न पोहचता गावातच मिटवावीत, यासाठी पोलिसपाटलांची महत्त्वाची भूमिका असते. परंतु जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून पोलिस पाटलांची भरती झाली नाही. त्यामुळे अनेक गावांमध्ये पदे रिक्त आहेत. परिणामी, पोलिस प्रशासनावर ताण वाढला आहे. शिवाय, प्रशासन पातळीवरील अनेक कामे खोळंबली आहे. ही बाब लक्षात घेऊन पोलिस पाटलांची रिक्त पदे भरावीत नसता लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल असा ईशारा निवेदनात दिला आहे.
निवेदनावर बळीराजा फाऊंडेशन चे अध्यक्ष नारायण लोखंडे,विवेक जाधव,राहुल साबळे,दिपक गाडेकर,गोपाल गाडेकर,संदीप ढगे,पवन सांगळे,अर्जुन ढगे आदिंची उपस्थिती होती.

प्रतिक्रिया
जालना जिल्ह्यात पोलीस पाटलांचे तब्बल 700 हून अधिक पदे रिक्त असल्याने पोलिसांचा ताण वाढलेला आहे.गावातील वाद,तंटे मिटविण्यासाठी पोलीस पाटलांची भूमिका महत्वाची ठरते.त्यामुळं तात्काळ जिल्हा प्रशासनाने पोलीस पाटलांचे रिक्त पदे भरावीत.
नारायण लोखंडे – अध्यक्ष बळीराजा फाऊंडेशन

Previous articleजाफराबाद तहसील कार्यालयातील महसूल कर्मचारी संपावर तालुक्यातील नागरिकांचे हाल
Next articleअमरावती शहराची लोकसंख्या दहा लाख;”ट्राफिक सिग्नल”केवळ पाच. वाहतुकीची वाहत आहात २५ चौकात सिग्नल ची गरज.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.