आशाताई बच्छाव
म्हसरूळ येथे काल रात्री झालेल्या पावसात शेतकऱ्याचे अतोनात नुकसान
जाफराबाद तालुका प्रतिनिधी-मुरलीधर डहाके
दिनांक 15/07/2027
सविस्तर वृत्त असे की, जाफराबाद तालुक्यात दिंनाक १४ रोजी रात्री झालेल्या सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने म्हसरूळ येथील शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणत पिकांचे नुकसान झाले आहे. सोसाट्याच्या वाऱ्याने मका पीक जमीन दोस्त झाले आहेत.पीक जमीन दोस्त झाल्यामुळे शेतकरी राजाने उराशी बाळगलेले स्वप्न एका क्षणात भंगले आहे.तोंडाशि आलेल्या पिकाचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे.. म्हसरूळ येथील शेतकरी ज्ञानेश्वर शेजूळ यांची मका पूर्ण पणे खाली पडलेली आहे. तरी शेतकरी वर्गातून तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक सहकार्य करावे अशी विनंती करण्यात येत आहे. तहसीलदार साहेबांनी त्वरीत पंचनामे करण्याचे आदेश द्यावे असे शेतकरी वर्गातून बोलल्या जात आहे.