Home अमरावती अमरावतीत होणार शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे विभागीय कार्यालय, शासनाची मंजुरी.

अमरावतीत होणार शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे विभागीय कार्यालय, शासनाची मंजुरी.

97

आशाताई बच्छाव

1000546244.jpg

अमरावतीत होणार शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे विभागीय कार्यालय, शासनाची मंजुरी.
दैनिक युवा मराठा
पी.एन.देशमुख
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती
छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था पुणे या संस्थेच्या अधिनस्त अमरावती विभागीय कार्यालय अमरावतीमध्ये उभारण्यात येणार आहे. या कार्यालयाच्या इमारतीसाठी, तसेच आवश्यक मुला-मुलीचे वेग वेगळे वस्तीगृह आणि अभ्यासिकेचे इमारतीच्या बांधकामाला राज्य शासनाची मान्यता मिळाली या बांधकामासाठी अंदाजीत १७१.९८ कोटी रुपयाचा निधी देखील मंजूर करण्यात आला आहे. शहरातील नवसारी परिसरात शासकीय जागेवर या इमारतीचे बांधकाम करण्यात येणार आहे., मराठा, कुणबी, मराठा कुणबी, कुणबी मराठा या लक्षात गटातील लाभार्थ्यांना अभ्यासिका, मुला मुलींचे वेगवेगळे वस्तीगृह अभ्यासिका इमारतीच्या बांधकाम संदर्भातील प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आले होते. या बांधकामासाठी नवसारी येथील सर्वे नंबर २९ मधील१.४४ हे. आर व सर्वे नंबर१३३ मधील ०.८१ हे आर असे एकूण २.२५ हे . आर पैकी २.२४ शासकीय जमीन ही नियोजन विभागात सारथी संस्थे करिता देण्यात आली आहे. येथे छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्थेचे विभागीय कार्यालयाच्या इमारतीच्या बांधकामासाठी आवश्यक १७१.९८ कोटी रुपयाचे अंदाजपत्रक सार्वजनिक बांधकाम विभागाने सारखीच्या मार्फत शासनाला पाठविले होते. त्यामुळे या प्रस्तावाला मान्यता देण्याबाबतचा निर्णय शासन विचार धीन होता. अखेर ९ जुलै रोजी शासनाने या इमारत बांधकामाला मंजुरी दिली असून तसा शासन निर्णय जाहीर केला आहे. या विभागीय कार्यालयामुळे जिल्ह्यासह अमरावती विभागातील मराठा, कुणबी, मराठा कुणबी, कुणबी मराठा समाजातील मुला मुलींना याचा लाभ मिळणार आहे.

Previous articleचाळीसगावात तरुणाकडून बस स्थानकातच गावठी कट्टा जप्त…
Next articleआमदार कृष्णा गजबे यांच्या सेवावृत्तीचे पुन्हा दर्शन अपघातग्रस्ताच्या मदतीला धावले आमदार कृष्णा गजबे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.