आशाताई बच्छाव
चाळीसगावात तरुणाकडून बस स्थानकातच गावठी कट्टा जप्त…
चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- चाळीसगाव शहर पोलीसांनी पुण्याहून कन्नडकडे जाणार्या प्रवाशाकडून एक गावठी कट्टा जप्त केला . चाळीसगाव बस स्थानकात पहाटे ही कारवाई करण्यात आली. गणेश तुकाराम पवार (25) रा. बोरमाळी ता. कन्नड असे ताब्यात घेतलेल्या तरूणाचे नाव असून त्याच्याकडून 2 जीवंत काडतुसे व 1 मॅगझिन आणि 2 मोबाईल असा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनच्या वतीने पोउनि/ सुभाष पाटील, पोहेकॉ/1720 राहूल सोनवणे, पोहकॉ नितीश पाटील, पोना महेद्र पाटील ,पोकॉ समाधान पाटील , अमोल पाटील , आशुतोष सोनवणे, विजय पाटील, राकेश महाजन, रविद्र बच्छे, पवन पाटील, मनोज चव्हाण यांना रात्रगस्त पेट्रोलींग कामी नेमलेले होते.त्यातील पोकॉ समाधान पाटील , अमोल पाटील शहरात गस्त घालत असतांना पोकॉ. समाधान पाटील, अमोल पाटील हे चाळीसगाव बस स्थानकात कुणी संशयित आहेत का हे पाहण्यासाठी गेले असता बस स्थानकाच्या नियंत्रण कक्षासमोर एक तरूण संशयितरित्या बसलेला दिसला. पोलीसांनी त्याची विचारपूस केली असता त्याने पुणे येथून नागद येथे जात असून बसची वाट पाहत असल्याचे सांगितले.मात्र त्याच्या हालचालींीवरून तो काहीतरी लपवत असल्याने पोलीसांना त्याचा संशय बळावला.
त्याची विचारपूस केली असता गणेश तुकाराम पवार (25) रा. बोरमाळी ता. कन्नड हमु. नानेकरवाडी, चाकण ता. खेड पुणे असे नाव सांंगितले. तरुणाची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला गावठी पिस्तुल लावलेले दिसले.
पोलीसांनी पिस्तुलसह एक मॅगझिन, दोन जीवंत काडतुसे, दोन मोबाईल असा सुमारे 51 हजार 450 रूपयांचा ऐवज जप्त केला.
पोकॉ. समाधान पाटील यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला भारतीय हत्यार कायदा कलम 3,25,29 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पवार यास अटक करण्यात आली आहे.तपास उपनिरीक्षक योगेय माळी करीत आहेत. दरम्यान आरोपी गणेश पवार याचे विरूद्ध आळंदी पोलीस स्टेशला भारतीय हत्यार कायदा कलम 3,25,29 प्रमाणे गुन्हा दाखल असल्याची माहिती चाळीसगाव पोलीसांनी दिली.






