Home जालना “मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण” योजना जालना जिल्हयात प्रभावीपणे राबवावी– जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण...

“मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण” योजना जालना जिल्हयात प्रभावीपणे राबवावी– जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ

121

आशाताई बच्छाव

1000543267.jpg

 

“मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण” योजना

जालना जिल्हयात प्रभावीपणे राबवावी– जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ

 

उत्कृष्ट काम करणाऱ्या अंगणवाडीसेविका / कर्मचाऱ्यांचा केला जाणार गौरव 

 अर्ज भरताना महिलांना समस्या भासू देऊ नयेत       

जालना, दि. 12 (दिलीप बोंडे ब्युरो चीफ) :-  महिलांसाठी राज्यशासनाने “मुख्यमंत्री -माझी लाडकी बहीण”  ही महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केलेली आहे. जालना जिल्ह्यात ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी समन्वयाने कामे करुन योजनेची यशस्वीपणे अंमलबजावणी करावी. या योजनेतंर्गत सर्वात जास्त अर्ज नोंदणी करणाऱ्या अंगणवाडी सेविका व कर्मचाऱ्यांची तालुकानिहाय निवड करुन 15 ऑगस्टला त्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने गौरव करण्यात येईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले.

“मुख्यमंत्री -माझी लाडकी बहीण” योजनेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयातील महसुल भवन येथे बुधवारी (10 जुलै) आढावा बैठक संपन्न झाली. त्यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी बोलत होते. बैठकीस सर्व नगर परिषद, नगर पालिकांचे मुख्याधिकारी, जालना महानगर पालिकाचे सर्व अधिकारी, कर्मचारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय (नागरीक्षेत्र) अधिकारी-कर्मचारी, अंगणवाडी सेविका (नागरी क्षेत्र), “मुख्यमंत्री -माझी लाडकी बहीण” योजनेसाठी नियुक्त वार्डाधिकारी, कर्मचारी (नगर परिषद/नगर पालिका) क्षेत्र कर्मचारी आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ म्हणाले की, “मुख्यमंत्री -माझी लाडकी बहीण” योजनेचा लाभ सर्व पात्र महिलांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. त्यासाठी लाभार्थ्यांना योजनेची संपूर्ण माहिती सांगावी.

Previous articleपहेला ते निमगाव रस्त्याचे डांबरीकरण करा याकरिता भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांना निवेदन
Next articleमुरुड तालुक्यात मागील आठवड्यापासून पावसाने आज दमदार जोर धरला
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.