आशाताई बच्छाव
महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक पवित्रामुळे वाशिम ते पंढरपूर बसेस विठ्ठल दर्शनाकरिता वाशिम मधून बसेस रवाना ____वाशिम, निखिल धुत प्रतिनिधी वाशिम बस स्थानक येथे पाचशे प्रवासी यांचे नऊ वाजता पासून बसलेले होते येथे रवाना होणाऱ्या बसेस दिवसभरापासून एकही बस रवाना केलेली नव्हती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी यांच्यासोबत संवाद करून आम्हाला पंढरपूर कडे जाण्या करिता एकही बसेस उपलब्ध नाही असे उडवा उडीचे उत्तरे याची दखल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वाशिम यवतमाळ वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष गजानन वैरागडे, वाशिम शहराध्यक्ष रविभाऊ वानखडे, समाजसेवक रामभाऊ बाजड, लहुजी शक्ती सेनेचे वाशिम जिल्हा अध्यक्ष मोहनराज दुतोंडे, वाशिम जिल्हा कार्याध्यक्ष शंकर पाटील खंडारे, वाशिम डेपो मॅनेजर यांच्याशी चर्चा करून वाशिम येथून पंढरपूर जाण्याकरिता बसेस उपलब्ध करून देण्याचा हट्ट धरून या ठिकाणावरून पंढरपूर येथे जाण्याकरिता चार बसेसची व्यवस्था करून दिली त्या ठिकाणी सर्व वारकरी सांप्रदायिक माता भगिनींनी यांनी पदाधिकाऱ्यांची मनापासून आभार व्यक्त केला. एस टी महामंडळाच्या निर्लज्ज व्यवस्थापन दिसून आले .