आशाताई बच्छाव
मोताळा जि.बुलडाणा येथुन पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांच्या एसटी बसचे श्री जालिंदर बुधवत यांच्याकडून पूजन. वारकरी बंधु आणि भगिनींना दिल्या प्रवासासाठी शुभेच्छा
बुलढाणा,(संजय पन्हाळकर ब्युरो चीफ युवा मराठा न्यूज नेटवर्क)- आषाढी कार्तिकी, पंढरीची ओढ, मुखी नाम गोड, पांडुरंग.! चालती पाऊले, पंढरीची वाट, वारीचा तो थाट, काय वर्णू.!! आषाढी एकादशी निमित्त आज दि. ९/७/२४ रोजी मोताळा जिल्हा बुलडाणा येथुन पंढरपूर ला जाण्यासाठी एसटी बस रवाना झाली. मोताळा शहरातील व तालुक्यातील वारकरी बंधू आणि भगिनी या बसने पंढरपूरला रवाना झाले. त्यानिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख श्री जालिंदर बुधवत यांनी एसटी बसची पुजा केली. बसला हिरवी झेंडी दाखविली तसेच चालक- कंडक्टर यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला व भाविकांना प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी मोताळा नगर परिषदेच्या नगराध्यक्ष सौ माधुरी ताई देशमुख, वंचित बहुजन आघाडीचे नेते श्री प्रशांत वाघोदे, उप जिल्हा प्रमुख श्री सुनील घाटे, श्री सुधाकर सुरडकर, श्री रमेश धुनके यांच्यासह मोताळा शहरातील तसेच परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.मोताळा जि.बुलडाणा येथुन पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांच्या एसटी बसचे श्री जालिंदर बुधवत यांच्याकडून पूजन. वारकरी बंधु आणि भगिनींना दिल्या प्रवासासाठी शुभेच्छा
आषाढी कार्तिकी, पंढरीची ओढ, मुखी नाम गोड, पांडुरंग.! चालती पाऊले, पंढरीची वाट, वारीचा तो थाट, काय वर्णू.!! आषाढी एकादशी निमित्त आज दि. ९/७/२४ रोजी मोताळा जिल्हा बुलडाणा येथुन पंढरपूर ला जाण्यासाठी एसटी बस रवाना झाली. मोताळा शहरातील व तालुक्यातील वारकरी बंधू आणि भगिनी या बसने पंढरपूरला रवाना झाले. त्यानिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख श्री जालिंदर बुधवत यांनी एसटी बसची पुजा केली. बसला हिरवी झेंडी दाखविली तसेच चालक- कंडक्टर यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला व भाविकांना प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी मोताळा नगर परिषदेच्या नगराध्यक्ष सौ माधुरी ताई देशमुख, वंचित बहुजन आघाडीचे नेते श्री प्रशांत वाघोदे, उप जिल्हा प्रमुख श्री सुनील घाटे, श्री सुधाकर सुरडकर, श्री रमेश धुनके यांच्यासह मोताळा शहरातील तसेच परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.






