Home बुलढाणा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना प्रभावीपणे राबवणार गणेश गांधी

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना प्रभावीपणे राबवणार गणेश गांधी

230

आशाताई बच्छाव

1000535386.jpg

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना प्रभावीपणे राबवणार गणेश गांधी
स्वप्निल देशमुख
वानखेड :– संग्रामपूर तालुक्यातील वानखेड महाराष्ट्र शासनाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना घोषित केलेली आहे यामध्ये रुपये १५००/ महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत ही योजना १ जुलै पासून चालू होणार आहे सदर योजना महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत राबवल्या जाणार आहे अशी माहिती गणेश गांधी यांनी दिली आहे. या योजनेच्या अटी व शर्ती खालील प्रमाणे आहे. १) २१ ते ६० वर्ष

वयोगटातील विवाहित, परितकत्या, विधवा, महिला २) त्या महाराष्ट्रातील रहिवासी असल्याबाबतचे अधिवास प्रमाणपत्र ३) उत्पन्नाचे रू २.५० लाखापेक्षा जास्त नसावे म्हणजे कुटुंब प्रमुखाचे उत्पन्न अडीच लाखापर्यंत असावे ४) बँकेमध्ये सदर महिलेच्या नावे खाते असावी ५) रेशन कार्ड मध्ये सदर महिलेचे नाव असावे सदर योजना अंतर्गत सोमबार पासुन सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी नारी शक्ती दुत प प्ले स्टोअर वरून आपल्याला देण्यात आलेल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करून घ्यावयाचे आहे व आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व पात्र महिलांची नोंदणी महत्वाचे सर्वात पहिले अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी आपली नोंदणी या योजनेअंतर्गत पुढील आठवडधात सोमवार ते बुधवार पर्यंत १००% करून घेण्याचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची नोंदणी सदर नारी शक्ती दुत प मध्ये करून घेण्याची जबाबदारी अंगणवाडी पर्यवेक्षिका यांच्यावर सोपविण्यात आलेली आहे नोंदणी करत असताना १) उत्पन्नाचा दाखला सण २०२५ पर्यंत

वैद्य असणारा असावा २) जन्माचा दाखला असावा / टि.सी झेरॉक्स असावी ३) रेशन कार्ड ची झेरॉक्स असावी ४) आधार कार्ड ५) लाभार्थी नावाने बँक पासबुक झेरॉक्स सर्व माहिती प मध्ये अंगणवाडी सेविका यांनी भरावयाची आहे सोबत आधार कार्ड असणे आवश्यक आहे या व्यतिरिक्त अंगणवाडी सेविकेला गावातील इतर पात्र असणाऱ्या २१ ते ६५ वयोगटातील महिलांना सुद्धा आवश्यक कागदपत्र तयार करून गावातील सेतू केंद्रातून किंवा ग्रामसेवकांच्या माध्यमातून अर्ज १ ते १५ जुलै २०२४ या कालावधी गावातील कोणतीही २१ ते ६५ वयोगटातील पात्र असणारी महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने पासुन बंचित राहणार नाही याची दक्षता सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी घ्यावी गावातील जेवढे ग्रुप असतील त्या सर्व ग्रुपमध्ये या योजनेबाबत माहिती टाकावी काही आवश्यकता असल्यास त्यांनी ग्रामपंचायत कार्यालय वानखेड मध्ये येऊन संपर्क साधावा असे आवाहन
भारतीय जनता पार्टी संग्रामपूर ग्रामीण मंडल कोषाध्यक्ष गणेश गांधी वानखेड तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा यांनी केले आहे