Home ठाणे संवर्गातील मुलींना मिळणार आता OBC, SEBC आणि EWS फुकट उच्च शिक्षण

संवर्गातील मुलींना मिळणार आता OBC, SEBC आणि EWS फुकट उच्च शिक्षण

48
0

आशाताई बच्छाव

1000532232.jpg

संवर्गातील मुलींना मिळणार आता OBC, SEBC आणि EWS फुकट उच्च शिक्षण

 

युवा मराठा न्यूज ठाणे ब्युरो चीफ :- फय्याज मोमीन

राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर करून महिलांना चांगली आनंदाची बातमी दिली आहे. त्याच बरोबर आता उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना १००% फी सवलतीचा निर्णय घेऊन OBC, SEBC आणि EWS संवर्गातील मुलींना राज्य सरकारनं मोठी भेट जाहीर केली आहे.

दरम्यान, व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणा-या ओबीसी मुलींना फी माफी देण्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवारांनी यंदाच्या बजेटमध्ये केली. केवळ मेडिकलच नाही तर अभियांत्रिकी, फार्मसी, मॅनेजमेंट, लॉ अशा विविध शाखांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या लाखो विद्यार्थिनी याचा फायदा होणार आहे.

अर्थमंत्री अजित पवारांनी केलेल्या घोषणेची अंमलबजावणी कधी होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. अखेर या घोषणेची प्रत्यक्षात अंमलबजावणी होण्याबाबात निर्णय झाला आहे. GR जाहीर जाहीर झाल्यानंतर राज्यभरातील OBC, SEBC आणि EWS संवर्गातील मुलींना उच्च शिक्षणात 100 टक्के फी सवलतीचा लाभ घेता येणार आहे.

Previous articleमहाराणा प्रतापसिंह चौकाचे सौदर्यीकरण करुन पुतळा बसवा
Next articleजिल्हाध्यक्षांचे आवाहन खासदार सुनील तटकरेंच्या वाढदिवसाला जनसागर लोटणार !
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here