Home बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यात पावसामुळे जनजीवन विस्कळित

बुलढाणा जिल्ह्यात पावसामुळे जनजीवन विस्कळित

243

आशाताई बच्छाव

1000529380.jpg

ज्ञानेश्वर पाटील दांदळे/ब्युरो चीफ बुलढाणा :
गेल्या काही दिवसांपासून उष्णतेमुळे सर्वजण त्रस्त
झालेले दिसत होते. पावसाळा लागून जवळपास महिना पूर्ण होत असून पुरेसा पाऊस येत नसल्याने शेतकरीही अडचणीत आलेला होता. मात्र काल ७ जुलैच्या सायंकाळपासून बुलढाणा जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे बुलढाणा जिल्ह्यातील काही तालुक्यात जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसामुळे भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले असून, अनेक ग्रामीण भागात पुराचे भयानक दृश्य पहायला मिळत आहे. सुमारे २२ तास सुरू असलेल्या पावसामुळे खामगावातील अनेक वस्त्यांमध्ये तसेच घरांमध्ये पाणी शिरले असून अनेकांच्या सामानाचे घरातील वस्तूचे नुकसान झाले आहे. पावसामुळे बुलढाणा-खामगाव, शेगाव आणि शेगावं ते वरवट रोडवरील कालखेल येथील पुलावरून पाणी असल्याने या रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बऱ्याच वेळ ठप्प झाली होती त्यावेळेस पुलाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या तसेच खामगाव येथील सुटाळा पुलावरून मोठा पूर गेल्याने चारचाकी वाहन व पानटपरी वाहत असल्याचे व्हिडिवो सोशल मीडियावर दिसून येत आहेत.

Previous articleभिडेवाडा आंतरराष्ट्रीय काव्य महोत्सवात ‘ जालन्यातील कवी भानुदास शेवाळे यांचं काव्य सादर
Next articleस्टॉप डायरिया अभियान प्रभावीपणे राबवावे -मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.