Home बुलढाणा शाळेच्या अध्यक्षांनी केले शिक्षिकेसोबत अश्लील कृत्य खामगाव शहर पोलीस ठाण्यात अध्यक्ष विरोधात...

शाळेच्या अध्यक्षांनी केले शिक्षिकेसोबत अश्लील कृत्य खामगाव शहर पोलीस ठाण्यात अध्यक्ष विरोधात गुन्हा दाखल….

209

आशाताई बच्छाव

1000526938.jpg

शाळेच्या अध्यक्षांनी केले शिक्षिकेसोबत अश्लील कृत्य खामगाव शहर पोलीस ठाण्यात अध्यक्ष विरोधात गुन्हा दाखल….
युवा मराठा न्यूज संजय पन्हाळकर बुलढाणा जिल्हा चीफ
खामगाव :-बुलढाणा दिवसेंदिवस महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना वाढ होत चालली आहे. असाच एक प्रकार खामगाव शहरात घडला आहे एका शाळेच्या अध्यक्षांनी शाळेतील शिक्षिकेसोबत अश्लील कृत्य करून तिचा विनयभंग केला आहे ही घटना 2023 ते 2024 च्या दरम्यान घडली आहे. गोपाल बाबुराव अग्रवाल असे आरोपीचे नाव आहे.सविस्तर वृत्त असे की पीडित महिला एका शाळेत शिक्षिका म्हणून काम करत होती कोरोना असल्यामुळे शाळा बंद होते तेव्हा ऑनलाईन पद्धतीने क्लास घेऊन वेदना शिकवण्यात येत होते 2021 पासून शाळा नियमित सुरू झाली त्यावेळी शाळेचे अध्यक्ष हे अधून मधून शाळेच्या वेगवेगळ्या कामासाठी शाळेतील शिक्षकांना मार्गदर्शन करत असे शाळेत नवीन ऍडमिशन करण्याकरता शिक्षकांना अध्यक्ष यांनी सूचना केल्या त्यानुसार पीडित शिक्षिकेने वीस विद्यार्थी पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची ऍडमिशन केली त्यामुळे अध्यक्ष यांनी शिक्षकेला केबिनमध्ये बोलून अभिनंदन केले पीडित महिलेला अश्लील हावभाव करून जवळची साधनेच प्रयत्न केला सदर घटनेकडे महिलेने मुलाच्या भविष्यासाठी दुर्लक्ष केले मात्र अध्यक्ष याचा प्रताप काही थांबेना जानेवारी 2024 मध्ये अध्यक्ष यांनी पीडित महिलेला परत अश्लील कृत्य करून महिलेचा विनयभंग केला त्रासाला कंटाळून नोकरी सोडण्याचा राजीनामा पीडित महिलेने दिला मात्र त्यावेळी राजीनामा स्वीकारला नाही. वारंवार अश्लील कृत्य करत सदर महिलेचा विनयभंग करत राहिले. सततच्या त्रासाला कंटाळून महिलेने खामगाव शहर पोलीस स्टेशनला शाळेचे अध्यक्ष गोपाल अग्रवाल यांच्या विरोधात तक्रार दिली सदर घटनेचा पुढील तपास खामगाव शहर पोलीस स्टेशन करत आहे

Previous articleदेवळा – मालेगाव रस्त्यावर भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू, चार जखमी
Next articleमुकबधीर मतिमंद मुलांचे शाळेत जणू आईवडील व्हा – हरदीप ठवरे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.