Home बुलढाणा बँक ऑफ महाराष्ट्र शाखाचा सावळा गेंधळ दुय्यम व्यवस्थापकाची नागरिकांसोबत उद्धट वर्तन नविन...

बँक ऑफ महाराष्ट्र शाखाचा सावळा गेंधळ दुय्यम व्यवस्थापकाची नागरिकांसोबत उद्धट वर्तन नविन कर्ज देण्यास टाळाटाळ ….

36
0

आशाताई बच्छाव

1000522264.jpg

बँक ऑफ महाराष्ट्र शाखाचा सावळा गेंधळ दुय्यम व्यवस्थापकाची नागरिकांसोबत उद्धट वर्तन नविन कर्ज देण्यास टाळाटाळ ….
युवा मराठा न्यूज संजय पन्हाळकर बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ
चिखली:- बुलढाणा चिखली तालुक्यातील मौजे मेरा खुर्द येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मेरा खुर्दचे दुय्यम व्यवस्थापक यांचे कडून नागरिकांसोबत अरेरावी धोरण राबवून त्यांची पिळवणूक केल्या जात असल्याचा प्रकार ४ जुलै रोजी घडला आहे.मेरा खुर्द येथे अंत्रीखेडेकर मेरा बु आसोला बु मनुबाई बायगाव इत्यादी 6ते 7गावाची महाराष्ट्र बँक ही शासकीय बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र येथे या सहा ते सात गावाच्या शासकीय योजनेसाठी शासनाने शासकीय बँक मेरा खुर्द येथे स्थापन केली आहे परंतु बँक ऑफ महाराष्ट्र येथील नवीन कर्ज देण्यास टाळाटाळ करत आहे याबाबत माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्याशी संपर्क साधला असतो त्यांनी एमडीएम यांचा यांच्याशी संपर्क साधण्याचे सांगितले संपर्क साधून सुद्धा बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मेरा खुर्द येथील दुय्यम व्यवस्थापकांनी नवीन कर्ज देण्यास टाळाटाळ केली आहे बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मेरा खुर्द येथे काही शेतकऱ्यांच्या एका वर्षापासूनच्या पीक कर्जाच्या फाईल पडून आहे जर बँक ऑफ महाराष्ट्र या शासकीय बँकेने कृषी कर्ज दिले नाही तर काही शेतकऱ्यांना प्रायव्हेट सोसायटी मधून कर्ज काढावे लागेल प्रायव्हेट सोसायटीचा व्याजदर हा जास्त असल्यामुळे त्यांना आत्महत्येस प्रवृत्त करण्यास बँक ऑफ महाराष्ट्र ही प्रवृत्त करत असल्याचे मेरा खुर्द शाखेमध्ये दिसत आहे जिल्हाधिकारी महोदयांनी सांगून सुद्धा जर बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मेरा खुर्द ही नवीन कृषीकर्ज देण्यासाठी टाळाटाळ करत असेल तर येथील मुजर दुय्यम व्यवस्थापक यांना आता कोणाचा धाक उरला नाही असे दिसून येत आहे
बँकेत दुय्यम व्यवस्थापक यांचे नियोजन नसल्यामुळे ग्राहकांचा गोंधळ होत असल्याचे दिसुन येत आहे
मनमानी करणाऱ्या दुय्यम व्यवस्थापकवर कारवाईची मागणी मेरा खुर्द येथील नागरिकांनी केली
बँकेत ग्राहकांचा गोंधळ
चिखली तालुक्यातील मेरा खुर्द येथे एकमेव बँक ऑफ महाराष्ट्र शाखा आहे. या शाखे अंतर्गत सहा ते सात गावे समाविष्ट असल्याने परिसरातील शेतकरी कर्जदार, खातेदार , वयोवृध्द, निराधार यांची दररोज बँकेत गर्दी असते. त्यातच आता शासनाने लाडकी बहिण योजना जाहीर केली. या योजनेचा महिलांना लाभ घेण्यासाठी बँकेच्या पासबुकची आवश्यकता भासत आहे त्यामुळे महिला पासबुक काढण्यासाठी बँकेत गर्दी करत आहे. तसेच निराधार योजनेचे लाभार्थी सुध्दा मानधन घेण्यासाठी बँकेत जात आहे. बँकेत होणारी गर्दी पाहून नुकतेच काही महिन्यापूर्वी रूजू झालेले दुय्यम निबंधक हे ग्राहकासोबत उद्धट वर्तन करत बसून ठेवतात किंवा आज नाही. उद्याला या असे म्हणून घरी पाठवून देतात.
मनमानी करणाऱ्या दुय्यम व्यवस्थापकवर कारवाईची मागणी केली
तसेच शासन पीककर्ज माफी देण्याच्या प्रयत्नात आहे त्यामुळे थकित पीककर्ज भरणा करू नये असे म्हणुन शेतकऱ्यांना पिककर्जाचे वाटप करत नाही. सुरळीत उत्तर न देता किंव्हा तक्रारीची कोणतेही निवारण न करता ग्राहकासोबत हुज्जत घालतात असा प्रकार घडत असल्याने मोठया प्रमाणावर नागरिकांनी बँकेत गर्दी केली होती. या बाबतीत शाखा दुय्यम निबंधक यांना विचारले असता त्यांनी सागितले की माझी तक्रार करा कारण मला बदली हवी आहे, असे भाषा वापरल्या जाते. त्यामुळे जाणून बुजून ग्राहकासोबत उद्धट वर्तन करून त्रास दिल्या जात आहे . तरी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेवून अशा मनमानी करणाऱ्या दुय्यम व्यवस्थापकवर कारवाईची मागणी केली आहे.

Previous articleसुकर अर्ज प्रक्रिया – जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील , शांततेत अर्ज प्रक्रिया करण्याचे आवाहन….
Next articleनाशिक हादरलं..! घरात घुसून तरुणाची हत्या; शेजारी झोपलेल्या भावालाही खबर नाही
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here