Home नाशिक नामपूरला दिवसा घरफोडी; दागिन्यांसह लाखोंचा ऐवज चोरी

नामपूरला दिवसा घरफोडी; दागिन्यांसह लाखोंचा ऐवज चोरी

117
0

आशाताई बच्छाव

1000522132.jpg

नामपूरला दिवसा घरफोडी; दागिन्यांसह लाखोंचा ऐवज चोरी
सतीश सावंत-विभागीय प्रतिनिधी : क.स.मा.दे.

नामपूर : येथील तुळजाभवानीनगर, एचडीएफसी बँकेमागे, मालेगावरोडवर अज्ञात चोरट्यांनी दिवसा घरफोडी करत लाखोंचा ऐवज लुटून नेला.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, पद्माकर मगर हे आपल्या कुटुंबासह नामपूरला वास्तव्यास असून नातेवाइकांकडे मांडवासाठी गेले असता दुपारी ११ ते २ वाजेदरम्यान त्यांच्या बंगल्याच्या कंपाउंडमध्ये अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करत घराचा कडीकोयंडा तोडला. घरात प्रवेश करून घरातील कपाट फोडून रोख रकमेसह लाखोंचा ऐवज लंपास केला. मांडवाचा कार्यक्रम आटोपून दुपारी ४ वाजता मगर परतले असता घरात त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी याबाबत नामपूर दूरक्षेत्रला झालेल्या घटनेची माहिती दिली. दिवसा झालेल्या घटनेमुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी पंचनामा करून या गुन्ह्याच्या तपासाला वेग दिला.

अनोळखींची माहिती द्यावी

“नववसाहतीतील नागरिकांनी आपल्या परिसरात कोणी अनोळखी व्यक्ती आढळून आल्यास संबंधित पोलिस प्रशासनास याबाबत त्वरित माहिती द्यावी परगावी जात असताना शेजाऱ्यांना याबाबत माहिती द्यावी.”

पुरुषोतम शिरसाठ, सहायक पोलिस निरीक्षक, जायखेडा

Previous articleएकाच कुटुंबामधील पाच जण बुडाले, लोणावळ्या मध्ये खूप धक्कादायक प्रकार घडला.
Next articleनाशिकमध्ये काम सांगितल्याच्या रागातून वेटरचा हॉटेल चालकावर कोयत्याने हल्ला
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here