आशाताई बच्छाव
कुरवेल ग्रामपंचायत कामांची पोल खोल
चोपडा जळगाव प्रतिनिधी :
सुरेंद्र बाविस्कर
गेल्या दोन वर्षापासून कुरवेल गावामध्ये अंडरग्राउंड गटारीचे काम चालू आहे जवळ जवळ 80 टक्के गटर लाईन अंडरग्राउंड करण्याचे काम झाले आहे उर्वरित कामही लवकरात लवकर होईल असे ग्रामसेवक स्वप्नील निनायडे यांचे म्हणणे आहे.
विषय असा आहे की, आता पावसाळा चालू झाला आहे गटारीचे काम तर होतच आहे परंतु ज्या ठिकाणी गटारीचे काम पूर्ण झाले आहे त्या ठिकाणी पावसाचे पाण्याचे नियोजन व्यवस्थित न लावल्याने कुरवेल गावातील ग्रामस्थ संतापले आहेत. गावात बऱ्याच ठिकाणी पावसाचे पाणी जाण्यासाठी गटर लाईन मध्ये चेंबरच बसवले नाही त्यामुळे पावसाच्या पाण्याचे मोठे मोठे डबके घरान पुढे साचत असल्याचे आढळून आले, पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन न लावल्यास गावात त अनेक साथीचे रोग पसरण्याची शक्यताही नाकारता येत नाही त्यामुळे कुरवेल ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य आणि ग्रामसेवक स्वप्निल निनायडे यांनी तात्काळ या गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे आणि यावर
काही उपाययोजना जर झाल्या नाहीत शेकडो आजारांना ग्रामपंचायत द्वारे आमंत्रण दिले जात आहे की काय हेही बघणे आवश्यक आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्याप्रमाणे या सर्व समस्यांवर जर काही उपाययोजना लवकरात लवकर झाल्या नाहीत तर
लवकरच या सर्व बाबी स्वच्छता आणि आरोग्य विभागाकडे सादर करण्यात येतील.






