Home नाशिक केंद्र व राज्य सरकारच्या रिक्षा आणि टॅक्सी पासिंग विलंब पन्नास रुपये दंड...

केंद्र व राज्य सरकारच्या रिक्षा आणि टॅक्सी पासिंग विलंब पन्नास रुपये दंड मागे घेण्यात यावा यासाठी पिपल्स रिपब्लिकन पार्टी राष्ट्रीय मजदुर रिक्षा चालक मालक सेनेतर्फे निवेदन

124

आशाताई बच्छाव

1000498208.jpg

नाशिक रोड प्रतिनिधी इम्तियाज अत्तार
केंद्र व राज्य सरकारच्या रिक्षा आणि टॅक्सी पासिंग विलंब पन्नास रुपये दंड मागे घेण्यात यावा यासाठी पिपल्स रिपब्लिकन पार्टी राष्ट्रीय मजदुर रिक्षा चालक मालक सेनेतर्फे निवेदन देण्यात आले
केंद्र व राज्य शासनाच्या वतीने रिक्षा टॅक्सीचे योग्य प्रमाणपत्र पासिंग याबाबत एक दिवस विलंब झाल्यास प्रतिदिन ५०/- रुपये दंड जेव्हापासून पासिंग नाही तेव्हापासून दंड हा नाशिक आरटीओ कडून वसूल केला जात असल्याने या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रात केंद्र शासनाच्या व महाराष्ट्र शासनाच्या वतीने जो निर्णय घेण्यात आलेला आहे या निर्णयाच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्र मध्ये रिक्षा चालक-मालक संघटना या आंदोलन करीत आहेत
त्यामुळे हा जो निर्णय आहे हा तात्काळ आपण मागे घेऊन रिक्षा चालकांवर होणारा जो जाचक कर लादला गेला आहे तो लवकरात लवकर मागे घेण्यात यावा.अशी विनंती आपल्याला या पत्राद्वारे करण्यात आले जर तसे न झाल्यास येणाऱ्या काळात तीव्र स्वरूपाचे आंदोलन केल्या जाईल.कृपया आपण या निवेदनाची दखल घ्यावी.
यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वखाली निवेदन महसूल आयुक्त प्रवीण गेडाम साहेबांना निवेदन देण्यात आले,यावेळी राष्ट्रीय रिक्षा चालक संघटनेचे मुरलीधर घोरपडे,विनोद धोत्रे,नितीन पगारे,शकील शेख,संतोष भालेराव,अमजद शेख, मुक्तार मणियार,अब्दुल सिद्दीकी,हनीफ शेख,मेहराज शेख,रफिक मंसुरी,अजू शेख,इंद्रजित भालेराव,जमीर मणियार,वैभव साळवे,अमर जाधव,अमोल ढाकणे,संतोष मनोहर,भारत जाधव,भारत झाल्टे,अमर जाधव,स्वप्नील दोंदे,उदय तायडे,गणेश चौधरी आदी प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Previous articleकुरवेल ग्रामपंचायत कामांची पोल खोल
Next articleशेषशायी विष्णू मूर्ती सिंदखेडराजामध्येच राहणार भारतीय पुरातत्व विभागाने केले स्पष्ट….
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.