Home जळगाव व्यथा बळीराजाची : कृषीप्रधान अशा आपल्या भारत देशात आपल्या अन्न दात्याला भोगावे...

व्यथा बळीराजाची : कृषीप्रधान अशा आपल्या भारत देशात आपल्या अन्न दात्याला भोगावे लागतात दुःख .

123

आशाताई बच्छाव

1000498176.jpg

व्यथा बळीराजाची : कृषीप्रधान अशा आपल्या भारत देशात आपल्या अन्न दात्याला भोगावे लागतात दुःख .
रावेर जळगाव. दि.२५.०६.०२४. हर्षल पाटील , ब्युरो चीफ युवा मराठा न्यूज
आपला देश हा कृषी प्रधान म्हणून ओळखला जातो मात्र आपण ज्या बळी राज्याच्या जीवावर सुखाचे जीवन जगतो मात्र त्याच बळी राजाला किती कष्ट करावे लागतात आणि किती संकटांना सामोरे जावे लागते. त्याच्या मालाला योग्य भाव मिळत नाही. बि बियाणे यांचे भाव गगनाला भिडले. त्यात निसर्ग साथ देत नाही. आणि त्यात मोठी गोष्ट चोरट्या चा धाक अशा परिस्थितीत या बिचाऱ्या ने करावे तरी काय हा मोठा प्रश्न त्याच्या समोर येतो .
अशीच एक घटना काल रावेर तालुक्यातील अजनाड या गावातील शेतकऱ्या सोबत घडली . येथील वर्षा प्रदीप पाटील या शेतकऱ्या च्या शेतात तील विद्युत ट्रान्सफॉर्मर च चोरट्यांनी फोडून त्यातील ऑईल आणि तांब्याची तार घेऊन गेले. पेरणी करून पंधरा दिवस झाले पीक लहान असताना त्याला पाण्याची खुप गरज आहे .त्यात वरुण राजाने ही पाठ फिरवली आहे . या बिचाऱ्या ने करावं तरी काय म्हणून आज आपल्या देशात शेतकरी हा सुरक्षित नाही . या कडे सरकार मायबापा ने लक्ष दिले पाहिजे . आणि आपला देश हा सुजलाम सुफलाम बनवायला पाहिजे .

Previous articleवानखेड येथे पिण्यासाठी दुषित पाणी पुरवठा ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात, नागरिक संतप्त.
Next articleकुरवेल ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रल्हाद बाविस्कर बिनविरोध
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.