Home बुलढाणा वानखेड येथे पिण्यासाठी दुषित पाणी पुरवठा ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात, नागरिक संतप्त.

वानखेड येथे पिण्यासाठी दुषित पाणी पुरवठा ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात, नागरिक संतप्त.

29
0

आशाताई बच्छाव

1000498172.jpg

वानखेड येथे पिण्यासाठी दुषित पाणी पुरवठा ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात, नागरिक संतप्त.

वानखेड, बुलढाणा (स्वप्नील देशमुख)- याविषयी सविस्तर माहिती अशी की, वानखेड येथे 140 गाव योजनेअंतर्गत ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेमधून ग्रामस्थांना पीण्यासाठी दूषित पाण्याचा पुरवठा केला जात असून, ग्रामस्थांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. यामुळे वानखेड येथील ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.नळातून पिण्याच्या पाण्यात जंतू व किडे येत असल्याने आरोग्याचा प्रश्न यानिमित्ताने पुन्हा ऐरणीवर आला आहे. पावसाळा सुरू झाला पाण्याची अशी समस्या निर्माण झाल्याने महिला व नागरिकांनी ग्राम पंचायतच्या बेजबाबदार कारभारावर संताप व्यक्त केला आहे.
पिण्याच्या पाण्यात जिवंत जंतू व किडे येत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. पावसाळ्याच्या तोंडावर अशाप्रकारचा पाणीपुरवठा होत असल्याने भीतीचे वातावरण पसरले असुन या दुषित पाणी पुरवठ्यामुळे अनेक साथीच्या रोगांची लागण होण्याची भीती निर्माण झाली आहे. अगोदरच वातावरणातील बदलामुळे साथीचे आजार पसरले असतांना दूषित पाण्यामुळे नवीन आजाराला आमंत्रण मिळत आहे.
. दूषित पाणीपुरवठ्यामुळे परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला.
पिण्याच्या पाण्यात किडे व जंतू आढळले आहेत.
वानखेड येथील ग्रामस्थांना दुषित पाण्याचा पुरवठा होत असलेले पाणी येथील ग्रामविकास अधिकारी यांनी पिऊन दाखवावे असा प्रश्न गावकऱ्यांच्या वतीने उपस्थित करण्यात आला आहे.असे पाणी प्यायले तर आजार पसरतील. याबाबत ग्रामपंचायतचा बेजबाबदारपणा उघड होतो. हे पाणी अधिकाऱ्यांनी प्यावे म्हणजे गांभीर्य कळेल.
-स्वप्निल देशमुख पत्रकार
👉 याबाबत आमच्या प्रतिनिधीने ग्रामविकास अधिकारी एम. एन. बोडखे यांच्याशी संपर्क साधला असता “मला तेवढेच कामं आहेत का?” माझे काही वैयक्तिक कामे सोडून मी गावाच्या समस्या सोडविण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही.मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी गावाला भेट देईन.तुम्हाला काय करायचे ते करा असे बोलून अंग झटकले.तर संग्रामपूर तालुक्यातील या वानखेड सारख्या गावात आरोग्य सुविधांचा देखील बोजवारा उडाला आहे.येथील प्रार्थमिक आरोग्य केंद्रात कुठल्याही सुविधा उपलब्ध नाहीत त्यामुळे ग्रामस्थांना वेळेवर आरोग्य सुविधा उपलब्ध होत नाही.आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ.वेळेवर हजर नसतात त्यामुळे वानखेड येथील ग्रामस्थांना आरोग्याच्या फार मोठ्या समस्या निर्माण झाल्या आहेत.येथील आरोग्य व्यवस्था सुस्थितीत नसल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.याची नैतिक जबाबदारी जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी स्विकारणार आहेत का? तसेच उर्मट व बेताल स्वरुपाची वक्तव्य करुन नागरीकांना वेठीस धरणाऱ्या ग्रामविकास अधिकारी बोडखेंवर पंचायत समिती प्रशासन नेमकी कोणती कार्यवाही करणार का? हा महत्त्वाचा मुद्दा असून आज वानखेड गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.ग्रामविकास अधिकारी एम. एन. बोडखे हे जेव्हापासून ग्रामपंचायत कार्यालय वानखेड येथील पदभार स्वीकारला तेव्हापासून सतत गैरहजर महिन्यातून एक किंवा दोन दिवस ग्रामपंचायत कार्यालयामध्ये येतात व पाच ते दहा मिनिटे बसतात आणि निघून जातात यासोबतच नागरिकांसोबत उद्धट बेताल वक्तव्य करतात ग्रामस्थांशि बेजबाबदारपणे वागतात अशा बेजबाबदार वर्तन करणाऱ्या व कामचुकार ग्रामविकास अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई का करण्यात येऊ नये असा सवालही गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे.याची वेळीच दखल घेऊन कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा युवा मराठा महासंघाने दिला आहे.

Previous articleसंघर्षाचा धगधगता निखारा राजेंद्र पाटील राऊत
Next articleव्यथा बळीराजाची : कृषीप्रधान अशा आपल्या भारत देशात आपल्या अन्न दात्याला भोगावे लागतात दुःख .
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here