Home जालना पंधरा दिवसात महादेव नगर खंडापुर येथील हातभट्टी दारु आणी गांजा विकणाऱ्यावर कारवाई...

पंधरा दिवसात महादेव नगर खंडापुर येथील हातभट्टी दारु आणी गांजा विकणाऱ्यावर कारवाई करा-प्रदिप पाटील खंडापूरकर

54
0

आशाताई बच्छाव

1000493643.jpg

पंधरा दिवसात महादेव नगर खंडापुर येथील हातभट्टी दारु आणी गांजा विकणाऱ्यावर कारवाई करा-प्रदिप पाटील खंडापूरकर
जिल्हा प्रतिनिधी जालना -वसंतराव देशमुख
दिनांक 24/ 06/2024
-इशारा-
पंधरा दिवसांत कारवाई केली नाही तर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे
इन्स्पेक्टर कोतवाल यांच्या तोंडाला काळे फासणार – राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापुरकर.

महादेव नगर खंडापुर येथील 8 दुकानात हातभट्टी ची दारु आणी गांजाची विक्री मोठ्या प्रमाणात चालते, पोलीसांनी हातभट्टीची दारु आणी गांजा जप्त करण्यास नकार दिला, पंचनामा करण्यास नकार दिला
महादेव नगर खंडापुर येथे हातभट्टी ची दारु आणी गांजा पिऊन अनेक नागरिकांचा मृत्यू झाला त्यांचे कुटुंब उघड्यावर घडले आहेत,अनेकांचे लिव्हर आणी किडण्या डॅमेज झाल्या आहेत. या हातभट्टी ची दारु, गांजा विकणाऱ्यांना पोलीस अभय देत असुन मदत करत असल्याचा आरोप अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.प्रदिप पाटील खंडापूरकर बाबा यांनी केला आहे.

अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघ्रर्ष समिती च्या शिष्टमंडळाने राज्य उत्पादन शुल्क विभागाचे लातुरचे इन्स्पेक्टर कोतवाल यांची भेट घेऊन त्यांना महादेव नगर खंडापुर येथील हातभट्टी दारुच्या बाटल्या आणी गांजाच्या पुड्या भेट दिल्या आणि राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापुरकर बाबा यांनी इन्स्पेक्टर कोतवाल यांना इशारा दिला की, येत्या 15 दिवसात महादेव नगर खंडापुर येथील हातभट्टी आणि गांजाची दुकाने बंद करा नसता तुमच्या “तोंडाला काळे फासून” “तुमची गाढवावर बसवुन धिंड काढु”, या वेळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा ॲड. राणीताई स्वामी, महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष आकाश गडगळे, लातुर जिल्हाध्यक्ष नेताजी जाधव, विभागीय अध्यक्ष सोशल मिडीया सुनील शिंदे, विभागीय अध्यक्षा जयश्री ताई भुतेकर, लातुर जिल्हाध्यक्षा सुवर्णाताई नाईक, मोक्षदा ताई भंडारकवठेकर लातुर जिल्हाध्यक्ष ब्रीक्स मानव अधिकार मिशन, गजानन मुगळे आदी पदाधिकारी उपस्थित होते

Previous articleसेवानिवृत्ती निमित्त प्रा.गुलाब भोयर यांचा सत्कार समारंभ.
Next articleजुनी पेन्शन संघटनेचा पुन्हा महाएल्गार, कर्मचारी पेन्शनसाठी आक्रमक पवित्रा घेणार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here