Home अमरावती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,; अमरावती भेटीत घेतले आई अंबादेवी व श्री एकविरा...

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,; अमरावती भेटीत घेतले आई अंबादेवी व श्री एकविरा देवीचे दर्शन. अंबादेवी मंदिर जिर्णोव्दारसाठी सहकार्य करणार.

61
0

आशाताई बच्छाव

1000492635.jpg

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,; अमरावती भेटीत घेतले आई अंबादेवी व श्री एकविरा देवीचे दर्शन. अंबादेवी मंदिर जिर्णोव्दारसाठी सहकार्य करणार.
दैनिक युवा मराठा
पी एन देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर मी आई श्री अंबा देवीचे दर्शन घेईन, असे ठरविले होते. त्यामुळे देवीचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे. श्री अंबादेवी मंदिराच्या जर्णोव्दारासाठी ह
जे सहकार्य लागेल तयार असल्याचे आश्वासन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी २३ रोहित प्रसार माध्यमांशी बोलताना दिले. गडकरी व कांचन गडकरी यांनी श्री अंबादेवी व श्री एकवीरा देवीचे दर्शन घेत पूजन केले. दोन्ही संस्थांद्वारे केंद्रीय मंत्र्याचा शाल ,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आ. प्रवीण पोटे, श्री अंबादेवी संस्थानचे अध्यक्ष विद्याताई देशपांडे, सचिव रवींद्र कर्वे, विश्वस्त विलास मराठे, किशोर बेंद्रे, अशोक खंडेलवाल, डॉ यशवंत मशांकर, डॉ जयंत पांढरी कर तसेच एकविरा देवी संस्थानचे अध्यक्ष डॉ. अनिल खराया, सचिव चंद्रशेखर कुलकर्णी, विश्वस्त राजेंद्र टेंबे उपस्थित होते. केंद्रीय मंत्र्यांनी श्री अंबादेवी मंदिराच्या जिर्णोव्दारा बाबत माहिती जाणून घेतली. त्यानंतर त्यांनी डॉ. पाठव सुपर व्हीजन आय केअर अँड सेंटरचे उद्घाटन केले. त्यानंतर हॉस्पिटल बडनेरा रोड येथे मित्रपिंड प्रत्यारोपण, अवयव पूर्ण प्राप्ती केंद्राचेही उद्घाटन केले. त्यानंतर मामा महिंद्र राडगावकर यांच्या भेट दिली.

Previous article26 जून शाहू महाराज जयंतीदिनी साकोली येथे रक्तदान शिबिर आयोजन
Next articleमेरा खुर्द भरोसा येथे आज चार वाजता मुक्ताबाई पालखीचे आगमन.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here