आशाताई बच्छाव
मेरा खुर्द भरोसा येथे आज चार वाजता मुक्ताबाई पालखीचे आगमन.
युवा मराठा न्यूज संजय पन्हाळकर बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ
चिखली बुलढाणा :-मुक्ताबाई पालखी सोहळ्याचे 325 वे वर्ष ,अखंड परंपरा, दरवर्षी हजारो वारकरी महिला पुरुष सहभागी असतात,मेरा बु व अंत्रीखेडेकर परिसरातील अनेक वारकरी सुद्धा या वारीत सहभागी होऊन पायी पंढरपूर ची वारी करतात, मुक्ताबाई आली म्हणजे साक्षात लक्ष्मी आपल्या गावात आली,अशी लोकांची भावना आहे,दरवर्षी मुक्ताबाई पालखी परंपरेने मेरा बु। गावात मुक्कामी येत असते परंतु 3 वर्षे पासून उलटा प्रवास होत असल्याने मेरा चौकी भरोसा ला मुक्काम करते,परंतु मेरा बु।। मधील सर्व गावकरी माउलीला भेटायला मेरा चौकी ला जातात व लाडू,बेसनवडी चा प्रसाद वारीतील वारकरी यांच्या साठी घेऊन जातात,या वर्षी मुक्ताबाई पालखी मध्ये बाराशे स्त्री पुरुष असून त्यांचे दिनांक 24 6 2024 रोजी मेरा चौकी भरोसा येथील शिवशंकर विद्यालय मध्ये राहण्याची व्यवस्था केली आहे तर भोजनाची व्यवस्था भरोसा येथेल भक्तमंडळीने केली आहे मेरा बुद्रुक येथील मुक्ताबाईचे भक्त यांनी बेसनवडी घेऊन मेरा खुर्द भरोसा येथे जाणार आहे तसेच अंत्रीखेडेकर येथील भक्ती सुद्धा दर्शनासाठी मेरा खुर्द भरोसा येथे जाणार आहे सदर परंपरा हि सव्वा तीनशे ते साडेतीनशे वर्षापासून चालू आहे त्यामुळे भक्तांना मुक्ताबाई पालखीचे आज दर्शन लाभणार आहे