आशाताई बच्छाव
शेतीच्या ओलीती साठी पाणी उपलब्ध करा: भाजप खासदार अनिल बोंडे यांची जलसंपदा विभागाकडे मागणी.
दैनिक युवा मराठा
पी एन देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती
अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील शेंदुर्जना घाट पंढरी मध्य प्रकल्पावरील डाव्या कालव्याद्वारे जामठी गणेश कुरुक्षेत्रातील शेतकऱ्यांना ओलीत करिता पाणी देण्यात यावे अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांनी राज्यसभा खासदार (भाजप) डॉ. अनिल बोंडे यांच्याकडे केली होती. या मागणीच्या अनुषंगाने शेतकऱ्यांची हित लक्षात घेता शुक्रवारी २१ जूनला डॉ. अनिल बोंडे यांनी जलसंपदा विभागाचे मध्य प्रकल्प कार्यालयातील कार्यकारी अभियंत्याची भेट घेऊन शेतकऱ्यांना पिकासाठी पाणी उपलब्ध करून देण्यास मागणी केली. या संदर्भात दिलेल्या माहितीनुसार पंढरी मध्यम प्रकल्प क्षेत्र अंतर्गत जामठी गणेशपुरी हे क्षेत्र ११०० हेक्टरचे आहे. या क्षेत्राजवळील शेतकऱ्यांना ओलीत करता डाव्या कालव्याद्वारे पाणी उपलब्ध करावे, असे निर्देश यावेळी खासदार बोंडे यांनी अधिकाऱ्यांना दिले. यावर्षी पावसाळा कमी झाल्यामुळे पुढील हंगामातील सत्रातील शेतकऱ्यांना पाणी द्यायचे असल्यास ओलईतईसआठई पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे. या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाईपलाईन द्वारे पाणी व ओलईतपआणई पोचू शकत नाही. असे अनेक शेतकरी ओलईतच्यआ पाण्यापासून वंचित राहणार आहे. या भागातील शेतकऱ्यांना ओलईतईसआठई पाणी कसे उपलब्ध करता येईल याचे आयोजन करणे गरजेचे आहे. त्याकरिता पंढरी मध्यप्रकल्पावरील डाव्या कालव्याद्वारे गणेशपुर या क्षेत्रातील शेतकऱ्याला ओलीत करण्याकरिता पाणी उपलब्ध करून देण्या साठी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात यावे, अशी मागणी सुद्धा यावेळी खासदार डॉ अनिल बोंडे यांनी केली. यावेळी अधीक्षक अभियंता उध्र्व, वर्धा सिंचन मंडळ अमरावती म.ना. राजभोज कार्यकारी अभियंता मध्यम प्रकल्प अमरावती सु.पा. आडे, उपविभागीय अभियंता पंढरी मध्यम प्रकल्प उपविभाग विभागीय अ.बा. पाटील, तालुकाध्यक्ष महिला आघाडीच्या रूपाली सोंंडे, मोहन करदाते इंद्रभूषण सोंडे, जनक बरंगे आधी शेतकरी उपस्थित होते अशी माहिती आयोजकांच्या वतीने एक प्रसिद्ध पत्रका द्वारे कळविण्यात आलेआहे.






