Home बुलढाणा घाईगडबडीत शेतकऱ्यांकडून पेरण्या पण पावसाची हुलकावणी; बुलढाणा तालुक्यात दुबार पेरणीचे संकट…

घाईगडबडीत शेतकऱ्यांकडून पेरण्या पण पावसाची हुलकावणी; बुलढाणा तालुक्यात दुबार पेरणीचे संकट…

96

आशाताई बच्छाव

1000490519.jpg

घाईगडबडीत शेतकऱ्यांकडून पेरण्या पण पावसाची हुलकावणी; बुलढाणा तालुक्यात दुबार पेरणीचे संकट…
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :– यंदा चांगल्या पावसाची हवामान खात्यासह अनेक तज्ञ मंडळींनी अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांनी शेतीमशागतीवर चांगलाच भर दिला होता. त्यात बुलढाणा तालुक्यात बऱ्याच ठिकाणी जूनच्या पहिल्याच आठवड्यात हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी वर्गातही आनंदाचे वातावरण होते. त्यात काही शेतकऱ्यांनी घाईगडबडीत पेरण्याही आवरल्या.
यामध्ये सोयाबीन, उडीद, मुंग भुईमूग इत्यादीचा समावेश होता. मात्र, जूनच्या पहिल्या आठवड्यात बरसलेला वरूणराजाने काही दिवसांतच पाठ फिरवल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. आणखी काही दिवस जर पाऊसच झाला नाही. तर मात्र, दुबार पेरणीचे संकट आता शेतकऱ्यांसमोर आले आहे. आधीच आर्थिक ताळमेळ बिघडलेल्या शेतकऱ्यांची आता मोठी पंचाईत झाली आहे.
वाढलेले बियाणे खतांचे दर, शेतीमशागतीचे दर, त्यात दुबार पेरणीचे संकट यांमुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. तर कृषी विभाग इतर तज्ञ मंडळींनी शेतकऱ्यांनी घाई गडबड न करण्याचे आवाहान केले.100 मिमीपेक्षा जास्त पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये, असे सांगितले आहे.बुलडाणा तालुक्यात अद्यापही तसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे जमिनीत तसा गारवा ही झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी 100 मिली लीटर पेक्षा जास्त पाऊस झाल्याशिवाय पेरणी न करण्याची कृषी विभागाने आव्हाने केले होते

Previous articleजाफराबाद माधवगिरी महाराज यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यास भाविकांची गर्दी
Next articleशेतीच्या ओलीती साठी पाणी उपलब्ध करा: भाजप खासदार अनिल बोंडे यांची जलसंपदा विभागाकडे मागणी.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.