Home जालना पाथ्रीकर कॅम्पसमध्ये योगादिन साजरा

पाथ्रीकर कॅम्पसमध्ये योगादिन साजरा

35
0

आशाताई बच्छाव

1000488717.jpg

पाथ्रीकर कॅम्पसमध्ये योगादिन साजरा
बदनापूर, दि. २१(दिलीप बोंडे ब्युरो चीफ.)-योग दिवसाच्या निमित्ताने निर्मल क्रीडा व समाज
प्रबोधन ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. देवेश दत्ताभाऊ पाथ्रीकर यांच्या
मार्गदर्शनाखाली २१ जुन रोजी सकाळी ६ वाजता पाथ्रीकर कॅम्पस येथील
अडोटोरियम हॉल येथे पाथ्रीकर कॅम्पस व  बदनापुर डॉक्टर असोसिएशन यांच्या
संयुक्त विद्यमाने योग दिन साजरा करण्यात आला.
शारीरिक व मानसिक आरोग्य राखण्यासाठी नियमित योगासने करणे गरजेचे आहे.
‘योग’ ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे, असे डॉ. देवेश पाथ्रीकर
म्हणाले. यावेळी योग दिनानिमित्त योगगुरू प्रकाश राऊत (आयर्नमॅन) यांच्या
मार्गदर्शनाखाली योगा करण्यात आला. या वेळी डॉ. सुनील जायभाये, डॉ. मोहन
जोशी, डॉ. पी.जे. गाडगे, प्रा.योगीराज मुळे, महेश टेकने, सचिन कलवत्रे,
दत्तात्रय मिन्धर, डॉ. अरुण खैरे, डॉ. सुरेश कासट, डॉ. गौरव तातेड, डॉ.
कैलास भारती, डॉ. रामेश्वर पाटील, डॉ. अविनाश गाभणे, डॉ. भागवत, डॉ.
वाळके, डॉ. शिवा गायकवाड, डॉ. कृष्णा सरोदे, डॉ. अस्मिता खैरे, डॉ.
अश्विनी गायकवाड, डॉ. भागवत, अनुजा देशमुख, प्रीती देशमुख यांच्यासह
संस्थेतील सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.
००००००००००००००
फोटो ओळी….
१९-योग दिवसाच्या निमित्ताने निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्टचे
अध्यक्ष डॉ. देवेश दत्ताभाऊ पाथ्रीकर यांच्या मार्गदर्शनाखाली बदनापूर
येथील पाथ्रीकर कॅम्पसमधील अडोटोरियम हॉल येथे पाथ्रीकर कॅम्पस व
बदनापुर डॉक्टर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने योग दिन साजरा
करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here