आशाताई बच्छाव
पंकजाताई मुंडे यांची राज्यसभेवर वर्णी लागणार !
मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा
बीड दि:२१ जून २०२४ भाजपाच्या केंद्रीय सचिव पंकजा मुंडे यांची राज्यसभेवर वर्णी लागणार असल्याची खात्रीलायक माहिती सुत्रांकडून कळाली असून प्रदेश भाजप आणि केंद्रीय भाजप कार्यकरणीच्या वतीने पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर घेण्याच्या दृष्टीने हालचालींना वेग आला आहे. राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने केंद्रीय कार्यकारणी समितीच्या वतीने राज्यात अनेक निर्णय धडाधड घेण्यात येत आहेत. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपाला मिळालेल्या अपयशानंतर राज्यात अनेक घडामोडींना वेग आला आहे. याचाच एक भाग म्हणून पंकजा मुंडे यांची आता राज्यसभेवर वर्णी लावण्यात येणार आहे. ओबीसी चेहरा म्हणून तसेच मास लीडर म्हणून पंकजा मुंडे यांची राज्यात प्रतिमा असून या प्रतिमेचा फायदा विधानसभा निवडणुकीत पक्षाला होईल असा सूर समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीतून निघाला असून यावरून पंकजा मुंडे यांची राज्यसभेवर वर्णी लागणार आहे.