Home वाशिम वाशिममध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस महोत्सव अप्रतिम उत्साहात साजरा

वाशिममध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस महोत्सव अप्रतिम उत्साहात साजरा

109

आशाताई बच्छाव

1000485470.jpg

वाशिममध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस महोत्सव अप्रतिम उत्साहात साजरा
योगतज्ञ डॉ. भगवंतराव वानखेडे, सौ. दिपाताई यांनी दिले योगाचे धडे
वाशिम,( गोपाल तिवारी ब्युरो चीफ)- वाशिम जिल्हा पतंजली परिवार, आर्ट ऑफ लिव्हिंग, ब्रम्हकुमारी ओम शांती परिवार, नेहरू युवा केंद्र तथा अन्य योग सामाजिक संस्थांच्या वतीने शुक्रवार, २१ जून रोजी स्थानिक स्वागत लॉन येथे संपूर्ण पतंजली योग परिवाराच्या परिश्रमाने तसेच योगप्रेमींच्या अप्रतिम उपस्थितीत जिल्हास्तरावर योग दिवस महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला आमदार किरणराव सरनाईक, माजी आमदार विजयराव जाधव, राजू पाटील राजे, माजी आमदार पुरुषोत्तम राजगुरू, दिलीप हेडा, डॉ. हरीश बाहेती, राहुल तूपसांडे, भीम जीवनानी, उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, माजी मुख्याधिकारी वसंत इंगोले, अ‍ॅड. खंडेलवाल, ब्रमहकुमारी स्वाती दीदी, डॉ. सरोज बाहेती, डॉ. घुनागे, सिमा राजगुरू, प्रा. संगीता इंगोले, बापु ठाकूर, योगतज्ञ तथा भारत स्वाभिमान पतंजली योग परिवाराचे जिल्हा अध्यक्ष डॉ. भगवंतराव वानखडे,  किसान सेवा समिती जिल्हा प्रभारी शंकर उजळे, जिल्हा प्रभारी युवा भारत शिवशंकर भोयर, महिला प्रभारी महिला पतंजली योग समिती सौ. दीपा वानखडे, सुखदेव राजगुरू, नितीन घटमांल, गोपाल कोठेकर, अवघडे, पंत, झामरे, विलास ठाकरे, विठ्ठल ठाकरे, प्राचार्य जाधव, राजेश बोरकर, पुरुषोत्तम दुरतकर शैलेश, श्याम, संगीता राजगुरू, पंचभाई, राजू कलवार, महाले, मुसळे, बावणे, राजुरकर, गणेश गाभणे, प्रा. कहाते, अर्जुन चंदेल, मीना मापारी, सुलभा व्यवहारे, अंजू टावरी, बजाज, अघम, मालती दाभाडे आदींसह योगसाधिका व पुरुष कार्यकर्त्यांसह योग साधक योगशिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी स्वागत लॉनचे संचालक सुरेश लोथ यांचे विशेष सहकार्य लाभले. योगतज्ञ डॉ. भगवंतराव वानखडे, सौ. दीपा वानखडे, शंकर उजळे, ब्रह्मकुमारी स्वाती दीदी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच पतंजली परिवाराच्या वतीने सतत दोन वर्षापासून जुनी आयडीपी कॉलनी येथील बॅडमिंटन ग्राउंडवर रोज सकाळी साडेपाच ते सात वाजेपर्यंत निशुल्क योग वर्ग सुरू होता व नियमित सुरूच राहील. तरी वाशिमकर जनतेने या निशुल्क योग शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. भगवंतराव वानखडे यांनी केले आहे.

Previous articleमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शासकीय कार्यालयात ५०१ वृक्षांचे वितरण
Next articleनांदेड येथे दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे उत्साहात आयोजन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.