Home नाशिक ताहाराबाद व साल्हेर येथे विर एकलव्य व बिरसा मुंडांचे स्मारक व्हावे,नवनिर्वाचित खासदार...

ताहाराबाद व साल्हेर येथे विर एकलव्य व बिरसा मुंडांचे स्मारक व्हावे,नवनिर्वाचित खासदार शोभाताई बच्छाव यांना आदिवासी बचावचे निवेदन..!!!

281

आशाताई बच्छाव

1000485425.jpg

ताहाराबाद व साल्हेर येथे विर एकलव्य व बिरसा मुंडांचे स्मारक व्हावे,नवनिर्वाचित खासदार शोभाताई बच्छाव यांना आदिवासी बचावचे निवेदन..!!! ताहाराबाद,(प्रतिनिधि,प्रवीण भील) धुळे लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांचा आज बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्टय़ातील डांगसौंदाणे पठावे साल्हेर वाघंबा अलियाबाद जाड गोळवाड व इतर विविध गावांना आभार दौर्‍यावर आले असता आदिवासी बचाव अभियान के.ए.गृप च्या वतीने साल्हेर येथे निवेदन देण्यात आले.सदर निवेदनात म्हटले आहे की बागलाण तालुका हा आदिवासीबहुल तालुका असुन गेल्या चाळीस वर्षांपासून येथे आमदारदेखील आदिवासींचा निवडला जातो परंतु आदिवासींच्या समस्या या वाढतच आहेत. आदिवासीबहुल तालुका असल्यामुळे साहजिकच याठिकाणी आदिवासींचे दैवत भगवान विर एकलव्य तसेच क्रांतिकारक बिरसा मुंडा यांचे स्मारक असायला हवे.ताहाराबाद चौफुलीवर भगवान विर एकलव्य व साल्हेर येथे भगवान विर एकलव्य व बिरसा मुंडा यांचे स्मारक व्हावे जे काम गेल्या चाळीस वर्षात झाले नाही ते काम खासदार शोभाताई बच्छाव यांच्याकडून व्हावे अशी अपेक्षा असलेले निवेदन देण्यात आले.यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रावण चौरे तालुकाध्यक्ष प्रवीण भील उपाध्यक्ष दिपक देशमुख विजय बहिरम मधुकर भोये मयूर भोये दिपक गवळी एकनाथ सोनवणे व इतर आदिवासी बांधव व ग्रामस्थ उपस्थित होते..

Previous articleप्रबोधनकार कला साहित्य संघटना साकोली च्या वतीने जागतिक संगीत दिन साजरा
Next articleचक्‍क दुचाकीस्वारांनी दिवसाढवळ्या दोन लाखांची बॅग पळवली मलकापूर-बुलढाणा मार्गावरील घटना…
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.