Home बुलढाणा चक्‍क दुचाकीस्वारांनी दिवसाढवळ्या दोन लाखांची बॅग पळवली मलकापूर-बुलढाणा मार्गावरील घटना…

चक्‍क दुचाकीस्वारांनी दिवसाढवळ्या दोन लाखांची बॅग पळवली मलकापूर-बुलढाणा मार्गावरील घटना…

28
0

आशाताई बच्छाव

1000485450.jpg

चक्‍क दुचाकीस्वारांनी दिवसाढवळ्या दोन लाखांची बॅग पळवली मलकापूर-बुलढाणा मार्गावरील घटना…
युवा मराठा न्यूज संजय पन्हाळकर बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ
मलकापूर :- येथील बुलढाणा रस्त्यावर एका दुकानासमोर उभ्या दुचाकीवरील दोन लाखांची बॅग दुचाकीस्वारांनी पळवल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. पोलिसांनी शोधाशोध केली मात्र चोरटे पसार झाले.तालुक्यातील जांबुळधाबा येथील रहिवासी दीपक अजाबराव जवरे (वय ३६) गुरुवारी दुपारी पैसे काढण्यासाठी एका हॉटेल नजीकच्या बँक ऑफ इंडियाच्या स्थानिक शाखेत आले होते. पैसे काढल्यावर दुपारी १.४५ वाजताच्या सुमारास ते बँकेच्या बाहेर पडले. बुलढाणा रस्त्यावरील एका किराणा दुकानातून त्यांनी प्लास्टिक ग्लास खरेदी केले.
त्यानंतर बसस्थानक चौकात एका पान सेंटरवर पाने घेतली. पुढे आदर्श नगर नजीकच्या भाजीपाला दुकानातून भाजी खरेदी करीत असताना पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वारांनी दोन लाखांची रोकड, आधारकार्ड, पॅनकार्ड असलेली बॅग पळवली.
हा प्रकार एका दुकानदाराने दीपक जवरे यांना सांगितला. त्यांनी शहराकडे वळलेल्या त्या विना नंबरच्या दुचाकीचा पाठलाग केला. मात्र बसस्थानक परिसरात अचानक ती दुचाकी गायब झाल्याचे दिसून आले. त्यांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क केला.त्या अनुषंगाने पोलिस उपनिरीक्षक ईश्वर वरगे व पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बँक ऑफ इंडियाचे व इतर दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्यानंतर चोरट्यांचा शोध घेण्यासाठी धावाधाव केली. मात्र चोरटे पसार झाले होते. दीपक जवरे यांच्या मार्गावर चोरटे असल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल झाली असून पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहेत.
दरम्यान मलकापूर बसस्थानक तथा या मार्गावर अलिकडील काळात चोरट्यांचा तथा पाकीटमारांचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे पोलिसांनी पाकिटमारासंह या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरत आहे. याभागत सातत्याने असे प्रकार घडत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here