आशाताई बच्छाव
डी पॉल शाळेत मध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिन उत्साहात साजरा…. श्रीरामपूर,(दिपक कदम तालुका प्रतिनिधी)
डी पॉल शाळेत आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा करण्यात आला.याप्रसंगी शाळेचे मॅनेजर फादर शिजो, व्यवस्थापक फादर फ्रांको , प्रिन्सिपल ,सिस्टर सेलिन,सिस्टर दीप्ती,समन्वयक रविंद्र लोंढे सर, सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. शाळेचा प्रांगणात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सर्वात झाली.सिस्टर दीप्ती यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना व मान्यवरांचे स्वागत केले. यानंतर
डी पॉल इंग्लिश मिडीयम व डी पॉल पब्लिक स्कूल या दोन्ही शाळेच्या विद्यार्थीनी उत्स्फूर्तपणे विविध योगासने व प्राणायाम याचे प्रात्यक्षिक केले.सौ सोनम वधवा यांनी योगासनाचे महत्व विद्यार्थ्यांना समजाऊन सांगितले.सौ रेणुका राऊत यांनी योगदिना विषयी माहिती सांगितली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ हेमा कोहली व सौ ज्योती जाधव, यांनी केले.सौ
निशिगंधा फोपसे यांनी आभाप्रदर्शन केले.
सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी क्रीडा शिक्षक संदीप निबे व संदीप जाधव तसेच आशिष अमोलिक , नारायण झांबरे,सुनील बोरागे,दीपक कदम, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी याचे
सहकार्य लाभले.