Home धाराशिव धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयावर अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचा मोर्चा.

धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयावर अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचा मोर्चा.

105
0

आशाताई बच्छाव

1000481815.jpg

धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयावर अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचा मोर्चा.
जिल्हा प्रतिनिधी जालना-वसंतराव देशमुख
दिनांक 20/06/2024

तुळजापुर येथील अवैध विटभट्टी बंद करण्यात यावी या मागणी साठी आज धाराशिव येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघ्रर्ष समिती च्या वतिने अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा यांच्या नेतृत्वाखाली 2 तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले,शासनाला शेवटी आंदोलकांची मागणी मान्यच करणे भाग पडले.निवासी जिल्हाधिकारी शोभाताई जाधव यांनी सर्व अवैध विटभट्टी वाल्यांच्या विरोधात कार्यवाही करण्याचे आदेश तहसीलदार तुळजापुर यांना दिले.

या रस्ता रोको आंदोलनात अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापुरकर बाबा, धाराशिव जिल्हाध्यक्ष अब्दुल सय्यद, धाराशिव जिल्हाध्यक्ष गणेश पाटील, विभागीय अध्यक्षा जयश्री ताई भुतेकर, लातुर शहर जिल्हाध्यक्ष काशीबाई हांडे, सोलापूर जिल्हाध्यक्षा सविता ताई भोसले, जिल्हाध्यक्ष अरुणा ताई बेंजरगे, मुमताज तांबोळी, विभागीय अध्यक्ष सोशल मिडीया सुनील शिंदे,प्रदेश मुख्य संघटक गणीभाई मुलाणी, लताबाई आगळे, वृंदावणी ताई गवळी, बालाजी जाधव, पंडीत राव जळकोटे ,निर्मला ताई सुरवसे आदी पदाधिकारी उपस्थित होते*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here