Home गडचिरोली गडचिरोली मेडिकल कॉलेजची प्रवेश प्रक्रिया याच शैक्षणिक सत्रापासून सुरु होणार

गडचिरोली मेडिकल कॉलेजची प्रवेश प्रक्रिया याच शैक्षणिक सत्रापासून सुरु होणार

126

आशाताई बच्छाव

1000481664.jpg

गडचिरोली मेडिकल कॉलेजची प्रवेश प्रक्रिया याच शैक्षणिक सत्रापासून सुरु होणार

वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचे संबंधितांना याबाबत निर्देश

अखेर आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या प्रयत्नांना मिळाले यश

मुंबई मंत्रालयात वैद्यकीय शिक्षणमंत्री हसनजी मुस्लिम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न

गडचिरोली, सुरज गुंडमवार ब्युरो चीफ 

गडचिरोली मेडिकल कॉलेजच्या प्रवेश प्रक्रियेला या शैक्षणिक वर्षापासून कार्यान्वित करण्याकरिता आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केलेल्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री यांनी मेडिकल कॉलेजच्या या शैक्षणिक वर्षापासून प्रवेश प्रक्रिया राबविण्यासंदर्भात आज मुंबई मंत्रालयात झालेल्या बैठकीमध्ये संबंधितांना निर्देशित केले.

आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या विनंतीवरून वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी आज मुंबई मंत्रालयामध्ये या संदर्भात बैठकीचे आयोजन केले या बैठकीमध्ये गडचिरोली येथे मंजूर झालेल्या मेडिकल कॉलेजच्या प्रवेशप्रक्रियेसोबतच बांधकामा संदर्भात ,पदभरती संदर्भात, व यासंदर्भात राहिलेल्या अडीअडचणी दूर करण्यासंदर्भात विस्तृत चर्चा झाली. मेडिकल कॉलेजच्या प्रवेश प्रक्रिये संदर्भात येणाऱ्या अडचणी तातडीने दूर करून प्रवेश प्रक्रिया राबवावी असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
बैठकीला आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे सह राज्याचे वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव, कुलगुरू ,वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता,शिक्षण संचालक, आयुक्त , अधिक्षक अभियंता यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

Previous articleबेकायदेशीरपणे मंजूर लेआऊट तातडीने रद्द करा : शेतकरी कामगार पक्षाची मागणी गडचिरोलीत दोन हजार कोटींचा भ्रष्टाचार
Next articleमहिलांनी हेवेदावे सोडून कुटुंबव्यवस्था सदृढ बनवावी: मनाली भुतडा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.