Home बीड महिलांनी हेवेदावे सोडून कुटुंबव्यवस्था सदृढ बनवावी: मनाली भुतडा

महिलांनी हेवेदावे सोडून कुटुंबव्यवस्था सदृढ बनवावी: मनाली भुतडा

46
0

आशाताई बच्छाव

1000481679.jpg

महिलांनी हेवेदावे सोडून कुटुंबव्यवस्था सदृढ बनवावी: मनाली भुतडा

मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा

बीड/माजलगाव दि: २० जून २०२४ तुझं माझं करण्यापेक्षा महिलांनी हेवेदावे सोडून कुटुंब व्यवस्था सदृढ बनवण्याकडे लक्ष देणे काळाची गरज आहे. डोळ्यावर विशिष्ट रंगाचा चष्मा चढल्यास आपले व्यक्तिमत्व प्रगल्भ होण्याऐवजी दुर्लक्ष करण्याजोगे होते. असे प्रतिपादन सीए सौ मनाली भुतडा यांनी महेश नवमी निमित्त राजस्थानी मंगल कार्यालयात आयोजित महेशरत्न पुरस्कार वितरण सोहळ्यात केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती लीलादेवी मानधने, व्यासपीठावर पालक समुपदेशक मीरा बंग, तालुका उपाध्यक्ष उमेशकुमार जेथलिया, राधेश्याम लोहिया, संतोष बापू जेथलिया, राजेंद्र इंदानी, सागर मानधने, रमेश चांडक, डॉ कमलकिशोर लड्डा, सौ किरण गिल्डा उपस्थित होते. यावेळी जुगलकिशोर झंवर, जुगलकिशोर भुतडा यांना महेशरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सामाजिक उपलब्धी निमित्त अनेकांना गौरविण्यात आले. यावेळी मानधने परिवाराकडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोदकुमार जाजु प्रस्ताविक उमेशकुमार जेथलिया तर आभार जुगलकिशोर काबरा यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुका माहेश्वरी सभेचे पदाधिकारी, युवा सभेचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.

Previous articleगडचिरोली मेडिकल कॉलेजची प्रवेश प्रक्रिया याच शैक्षणिक सत्रापासून सुरु होणार
Next articleभगूर गावाला जोडणारा रस्ता खड्डामय     
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here