Home जालना पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांच्या प्रयत्नातून जालना पोलीस दलात ‘व्हॅनिटी व्हॅन’...

पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांच्या प्रयत्नातून जालना पोलीस दलात ‘व्हॅनिटी व्हॅन’ दाखल. जिल्हा प्रतिनिधी जालना -वसंतराव देशमुख

146

आशाताई बच्छाव

1000481391.jpg

पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांच्या प्रयत्नातून जालना पोलीस दलात ‘व्हॅनिटी व्हॅन’ दाखल.
जिल्हा प्रतिनिधी जालना -वसंतराव देशमुख
दिनांक 20/06/2024
याविषयीचे अधिक वृत्त असे की, जालना जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कायदा व सुव्यवस्थेचा तसेच इतर प्रकारचे बंदोबस्त लागलेले असतात. अशा बंदोबस्तात महिला अधिकारी व अंमलदार यांना नेमून दिलेल्या बंदोबस्त ठिकाणी अधिक कालावधीसाठी एकाच ठिकाणी उपस्थित राहावे लागते. त्यामध्ये महिला अधिकारी व अंमलदार यांना बंदोबस्ता ठिकाणी बाथरूम व त्यांच्या बाळांना दुग्धपण वगैरे करण्यासाठी काहीही व्यवस्था नसते त्यामुळे महिला अधिकारी व अंमलदार यांची मोठ्या प्रमाणात कुचंबणा होते. ही गैरसोय लक्षात घेता मा. श्री अजय कुमार बंसल पोलीस अधीक्षक जालना व मा. श्री आयुष नोपाणी अप्पर पोलीस अधीक्षक जालना यांचे विशेष प्रयत्नातुन जालना पोलीस दलात ‘व्हॅनिटी व्हॅन’ तयार करण्यात आली आहे. सदर व्हॅनिटी व्हॅनमुळे महिला पोलीस अधिकारी व अमलदार यांना यापुढे बंदोबस्ता ठिकाणी गैरसोय होणार नाही. सदरच्या ‘व्हॅनेटि व्हॅनचे’ लोकार्पण मा. श्री वीरेंद्र मिश्र विशेष पोलीस महानिरीक्षक छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र यांच्या हस्ते करण्यात आले आहे. सदरचे व्हॅनिटी व्हॅन तयार करण्यासाठी मा. पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल व मा. अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या आदेशान्वये श्री महेन्द्र मोहोड पोलीस निरीक्षक मोटार परिवहन विभाग जालना यांनी विशेष प्रयत्न केले.

Previous articleपोलीस भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांना पोलीस दलाचे आवाहन
Next articleबेकायदेशीरपणे मंजूर लेआऊट तातडीने रद्द करा : शेतकरी कामगार पक्षाची मागणी गडचिरोलीत दोन हजार कोटींचा भ्रष्टाचार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.